महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साधक आत्मस्वरुपात रममाण होतो

06:17 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

ईश्वराने प्राणिमात्रांच्या उपजीविकेसाठी अन्नसाखळी तयार केली असून त्यातून त्याने निर्माण केलेल्या जीवसृष्टीची पोटापाण्याची सोय केलेली आहे. बाप्पा म्हणाले, मनुष्य जे जे कर्तव्य करतो ते मीच त्याला नेमून दिलेले असल्याने त्या प्रत्येक कर्तव्यकर्मात मी आहे हे लक्षात ठेवा. हे लक्षात न घेता करत असलेलं काम ही आपली जबाबदारी आहे असं मनुष्य समजत असतो आणि त्यातील यशाने हुरळून जातो किंवा अपयशाने खचून जातो. हे योग्य नाही. त्यामुळे तो संसार चक्रात पुन:पुन्हा गुंतत जातो. म्हणून बाप्पा सांगतायत की, माणसाने कर्तव्यपालन करून स्वस्थ रहावं म्हणजे तो परमपदी पोहोचतो. जे ज्ञानी आहेत त्यांनी संसाराच्या महाचक्रावर आक्रमण करून ते भेदून टाकावं. ह्यात मुख्य अडथळा मनुष्य घेत असलेल्या उपभोगांचा असतो. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी असते. त्यामुळे तो अध:पतीत होऊन आणखीन आणखीन खालच्या योनीत जन्म घेत असतो. म्हणून बाप्पा असा निष्कर्ष काढतात की, जो, विषयोपभोगातून मिळणाऱ्या आनंदात रममाण होईल त्याला आत्मोद्धाराची फिकीर नसल्याने तो अधम म्हणजे तिरस्कार करण्यायोग्य समजावा. मनुष्य कायम भौतिक सुखांच्या मागे धावत असतो. संतती, संपत्ती, गाडी, बंगला म्हणजे सुख अशी त्याची कल्पना असते. पूर्वीच्याकाळचा मनुष्यसुद्धा त्याला अपवाद नव्हता हे लक्षात घेऊन बाप्पा सांगतायत,

Advertisement

अन्तरात्मनि य प्रीत आत्मारामो खिलप्रिय ।

आत्मतृप्तो नरो य स्यात्तस्यार्थो नैव विद्यते ।।17।।

अर्थ-अंतरात्म्यामध्ये जो संतुष्ट असतो, जो आत्मस्वरूपी रममाण असतो, ज्याला सर्वच प्रिय असते, ज्याचा आत्मा तृप्त असतो त्याला कोणत्याही बाह्यसुखाची ओढ नसते.

विवरण-मनुष्य जर कर्तव्यकर्म करून निरपेक्ष राहील तर सर्व सुखे त्याचा पाठलाग करत येतील असं माउलींनी ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायात सांगितलं आहे. माणसासाठी सगळ्यात मोठ्ठ सुख शांती आणि समाधान हे आहे ते मिळवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडत असतो. निरनिराळ्या वस्तुंच्या प्राप्तीतून तो हे मिळवण्याचा प्रयत्न करतो. वस्तुंच्या प्राप्तीतून आनंद मिळेल हा समजच मुळात चुकीचा असल्याने त्यानं आयुष्यभर केलेली धडपड व्यर्थ होऊन तो शांती आणि समाधानाला कायमचा पारखा होतो पण ज्याला बाप्पांनी आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अपेक्षा न करण्यातच शांती व समाधान दडलेलं आहे हे लक्षात आलंय तो कधीही बाह्य वस्तूतून सुखसमाधान शोधायच्या मागे जात नाही. त्याला हेही माहित असतं की, बाह्य वस्तूतून मिळालेला आनंद तात्पुरता असतो. वस्तूतील नाविन्य ओसरलं की, त्यातून मिळणारा आनंदही ओसरतो. आपणही हा अनुभव खूप वेळा घेतलेला असतो. सहज म्हणून बाजारात गेल्यावर आपल्याला अनेक नवनवीन वस्तू दिसतात. एखाद्या क्षणी आपल्याला त्या वस्तू अचानक आवडतात आणि आपण चटदिशी त्यातली एखादी वस्तू घेऊन घरी येतो. घरातल्या सगळ्यांनाही ती वस्तू आवडते आणि त्या वस्तूचे गुणगान करण्यात आपला दिवस आनंदात जातो. पुढील दिवसापासून त्या वस्तूतील अनोखेपण संपलेले असते त्यामुळे क्वचित कोणीतरी त्या वस्तूच्या उपयोगितेबद्दल बोलतात. पुढे पुढे तर त्या वस्तूच्या नवेपणातला आनंद संपल्याने सगळ्यांना तिचा विसर पडतो आणि ती वस्तू कधी अडगळीत पडली हे कुणाच्या लक्षातही येत नाही. अशा पद्धतीने मिळणाऱ्या तात्पुरत्या आनंदाची ज्ञानी माणसाला अपूर्वाई वाटत नसते. त्यामुळे त्याला बाह्य वस्तुंचं आकर्षण नसतं. त्या वस्तू असतील तर ठीक आणि नसल्या तरी चालतील असा त्याचा स्वभाव असतो. कसलाही मोह वाटत नसल्याने त्याला त्याच्या आत्मस्वरूपाची आठवण कायम असते आणि तो त्यात रममाण होऊन राहतो.

क्रमश:

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article