महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राम मंदिराची सुरक्षा अभेद्य

06:22 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अयोध्येत 110 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

Advertisement

अयोध्येतील भव्य राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राममंदिरात बसण्यासाठी रामलल्ला सज्ज झाला आहे. मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 ला होणार आहे. या दिवशी रामलल्लाच्या मूर्तीला मंदिरात पूर्ण विधीपूर्वक अभिषेक केला जाईल. विशेष म्हणजे रामलल्लाच्या अभिषेकपूर्वी मंदिरात हायटेक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभू रामलल्लाच्या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

भगवान रामलल्लाच्या भव्य मंदिरासह रामजन्मभूमी संकुलात सुमारे 110 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. राम मंदिर ट्रस्टने रामजन्मभूमी संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. रेड झोन, यलो झोन आणि अयोध्येच्या प्रवेशद्वारावर हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. रामनगरीची सुरक्षा कडेकोट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कॅमेरे लावण्यात आले आहेत.

सुरक्षा उपकरणांसाठी 38 कोटी

रामजन्मभूमी संकुलाला लागून असलेल्या रेड झोन आणि यलो झोनमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅ मेऱ्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. हा मास्टरप्लॅन राम जन्मभूमी संकुलाच्या सुरक्षेसाठी रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी बनवण्यात आला आहे. सुरक्षा उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकारने 38 कोटी रुपये मंजूर केले होते. पहिल्या टप्प्यात शहराची सुरक्षा भक्कम करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. सुरक्षा दलांसह तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्हींचीही रामलल्लाच्या शहरावर नजर राहणार आहे.

25 डिसेंबरपर्यंत सुरक्षा उपकरणे बसवणार

राम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलल्ला मंदिर परिसर 25 डिसेंबरपर्यंत सर्व सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असणार आहे. यासोबतच स्कॅनर प्रिस्क्रिप्शन मशीनसह उत्तर प्रदेश सरकारने खरेदी केलेली सुरक्षा उपकरणेही 20 डिसेंबरपर्यंत कॅम्पसमध्ये बसवली जातील. 30 डिसेंबरपर्यंत रामजन्मभूमी संकुलातील सुरक्षा, दिवाबत्ती आणि प्रवासी वाहतूक सुविधांचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article