For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तस्करांकडील अवैध पिस्तुल-काडतुसांचा रहस्यभेद !

06:35 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
तस्करांकडील अवैध  पिस्तुल काडतुसांचा रहस्यभेद
Advertisement

देशात अनेक ठिकाणी अवैध गावठी कट्टे आणि काडतुसे पकडली. अशा घटना नेहमी कानावर येतात. यामागील सोर्स काय? किंवा ती कोठुन येतात हे सर्वश्रुत आहे. मात्र ज्यावेळेस अत्याधुनिक शस्त्रास्त्रासह अत्याधुनिक काडतुसे सापडतात. त्यावेळेस नक्कीच भुवया उंचावल्या जातात. कारण यामागील सत्यता नेमकी काय, याचा अंदाज बांधता येत नाही. अशावेळी तस्कराकडे उपलब्ध असलेली अत्याधुनिक शस्त्रs आणि काडतुसांचा रहस्यभेद करण्याचे काम तपास यंत्रणांपुढे असते.

Advertisement

मुंबईतील पश्चिम उपनगरात क्राईम ब्रँचने अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून अत्याधुनिक पद्धतीची शस्त्रs म्हणजेच पिस्तुल, रिव्हॉल्वर आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मात्र ही शस्त्रs नेमकी कोणाला देण्यासाठी आणली होती की कोणत्या ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी आणली होती हे अद्याप समोर आलेले नाही. याचा तपास पोलीस करीतच आहेत मात्र अशा प्रकारची अत्याधुनिक शस्त्रs या तस्कराकडे येतातच कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र सोडले तर उत्तर प्रदेशात ज्या मुलांना च•ाrही घालता येत नाही, अशी मुलं गावठी कट्टे घेऊन फिरत असतात. येथे खुलेआम गावठी कट्ट्यांचे कारखाने आहेत. याची विक्री देशातील प्रत्येक राज्यात होत असते. यामध्ये महाराष्ट्र राज्य देखील अग्रेसर आहे. मुंबई पोलिसांनी अनेकदा अशा प्रकारची शस्त्रs घेऊन आलेल्या तस्करांचा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही घटना पाहता या तस्कराकडील गावठी कट्ट्यांच्या शस्त्रांची जागा अत्याधुनिक शस्त्रांनी घेतली आहे. यामुळे ही शस्त्रs आणि काडतुसे येतात कोठुन? यामागील रहस्य काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याच्या मुळाशी गेले तर अनेक उत्तरे सापडतात. मुंबईचे महत्त्व पाहता अनेक छोट्या-मोठ्या दादा-मवाल्यांनी आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुऊवात केली. त्यातच विदेशातून येणारा माल आणि त्यांच्या तस्करीमध्ये हाजी मस्तान आणि युसुफ पटेल यांनी चांगलेच नाव कमाविले. मात्र कोणत्याही क्षेत्रातील मक्तेदारी जास्त दिवस टिकत नाही. त्याप्रमाणे हाजी मस्तान, युसुफ पटेल, करीमलाला, वरदाराजन यांचा काळ निघून गेल्यानंतर अंडरवर्ल्डचा बेताब बादशहा म्हणून पाकमोडीया स्ट्रीट येथे राहणारा दाऊद इब्राहीम उदयास आला. पाहता पाहता त्याने मुंबईवर घट्ट पकड निर्माण करत आपले वर्चस्व सिद्ध केलं. मात्र पोलिसांचा ससेमिरा मागे लागताच त्याने दुबई गाठली. 1993 सालच्या

Advertisement

बॉम्बस्फोटानंतर दाऊदच्या एकसंध यंत्रणेला तडा जाऊन या टीममधून छोटा राजन वेगळा झाला आणि दाऊद हस्तकावर त्याने हल्लाबोल करण्यास सुऊवात केली. तर दुसरीकडे अऊण गवळी, अशोक जोशी, अमर नाईक दाऊदच्या बालेकिल्यावर धडक मारत होते. अशावेळी दाऊदने मोठा शस्त्रसाठा आणि काडतुसे मुंबईत पोहचविली होती. नव्वदच्या काळात शहरातील प्रत्येक गँगस्टरकडे अत्याधुनिक शस्त्रs आणि काडतुसे आल्यानंतर या गँगस्टरांनी चांगलाच धाक बसविण्यास सुऊवात केली होती. मुंबई पोलिसांकडे त्यावेळी अत्याधुनिक शस्त्रs नव्हती ती गँगस्टरांकडे असल्याने, पोलिस देखील धाकात होते. काळानुऊप अंडरवर्ल्ड खिळखिळे झाले. तर काही गुन्हेगारांनी स्वत: सुपारी घेण्यास आणि दहशत माजविण्यास सुऊवात केली आहे. यासाठी त्यांनी अनेक शस्त्र तस्कराकडे पिस्तुल-रिव्हॉल्वर आणि काडतुसांसाठी संपर्क करण्यास सुऊवात केली. मात्र पोलिसांनी देखील जोरदार कारवाईला सुऊवात केली असून, अवैधरित्या शस्त्रs विकणाऱ्यांच्या टोळ्यांचा पंचनामा करण्यास सुऊवात केली. अशावेळी विक्री करण्यासाठी आलेल्या हस्तकांकडे जी शस्त्रs आणि काडतुसे सापडत आहेत, ती नेमकी कोठून येत आहेत? याचे कोडे अद्याप पोलिसांना सुटले नाही.

ऑक्टोबर 2014 साली गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता कक्षाने पुणे येथून अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा शकीलच्या काही संशयीतांना अटक केली होती. हे संशयीत पुणे येथील भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णराव भेंगडे यांचे मामा लहु शेलार यांची हत्या करण्यासाठी देहु रोड येथे एकत्र जमले होते. मात्र वेळीच गुन्हे अन्वेषण विभागाने याचा पर्दाफाश केला. यावेळी नगरसेवक अमिन शेख याच्यासह तिघांना अटक केली होती. अमिन शेखकडे एक 7 पॉईंट 65 बोअरचे रिव्हॉल्वर मिळाले होते. मात्र या रिव्हॉल्वरवर मेड इन आर्मी हे पाहिल्यानंतर मात्र संपूर्ण पोलिस दल हादऊन गेले होते. कारण यापूर्वी ज्या गँगस्टरांना अटक केली होती, त्यांच्याकडे जी रिव्हॉल्वरे सापडली, त्यावर मेड इन युएसए, चायना, रशिया असे लिहलेले होते.

मात्र, प्रथमच मेड इन आर्मी अशा प्रकारचे रिव्हॉल्वर सापडल्याने नेमके हे रिव्हॉल्वर कोठुन आले, त्याचप्रमाणे अंडरवर्ल्डला मिळत असलेली काडतुसे कोठुन बाहेर येत आहेत? याकडे पोलिसांनी लक्ष देण्यास सुऊवात केली. अमिन शेखने चौकशीअंती रिव्हॉल्वरवर हा मजकुर स्वत: टाईप केल्याची जरी कबुली दिली असली, तरी पोलिसांचा त्यावर विश्वास नाही. कारण अंडरवर्ल्डला मिळत असलेली काडतुसे आणि शस्त्रास्त्रांच्या बाबतीत कोठे ना कोठे पाणी मुरत असल्याचा संशय पोलिसांना होता. उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यातून मोठ्या प्रमाणात रिव्हॉल्वर, देशी कट्टे, पिस्तुल अशी शस्त्रांची तस्करी खुलेआम मुंबई शहरात सुऊ असते. अशावेळी मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे देखील सापडत असल्याने, या काडतुसाबाबत देखील रहस्याचे वलय निर्माण झाले आहे. नुकतेच क्राईम ब्रँचच्या युनिट नऊने देखील अत्याधुनिक शस्त्रास्त्रासह जिवंत काडतुसे पकडली आहेत. ही शस्त्रास्त्रे, काडतुसे कोठून आली आहेत याचा मात्र तपास सध्या सुऊ आहे. काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांनी एका माओवाद्याला अटक केली असता, त्याच्याकडे जी काडतुसे सापडली होती, ती मध्यप्रदेशातील ऑर्डीनन्स फॅक्टरीमधील असल्याची कबुली त्याने दिल्याने, पोलिसांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण विदेशातून एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसांचा साठा येणे शक्यच नाही. एकवेळा येईल, दोनवेळा येईल, मात्र सातत्याने येणार नाही. यामुळे अवैध शस्त्रs, काडतुसे आणि ऑर्डीनन्स फॅक्टरी (शस्त्र कारखाने) यांचे काही कनेक्शन तर नाही ना? असा संशय तपास यंत्रणांना आल्याशिवाय राहणार नाही.

देशात नक्षलवाद्यांना आणि अंडरवर्ल्डमधील हस्तकांना शस्त्रs सहजरित्या उपलब्ध होतील, मात्र काडतुसे सहजा-सहजी उपलब्ध होणार नाहीत. मात्र ही काडतुसे नक्षलवाद्यापर्यंत आणि अंडरवर्ल्डच्या या हस्तकापर्यंत ऑर्डीनन्स

फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगार आणि मधील दलालामार्फत पोहचत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. यामुळे सध्या पकडण्यात आलेली अवैध शस्त्रs आणि काडतुसे यांचे नेमके रहस्य काय? ती कोठुन आली आहेत? याच्या मुळाशी पोहचण्याचे मोठे काम तपास यंत्रणांपुढचे आहे. कोणताही आधार नसताना आरोप करणे, सोपे असते, मात्र त्या आधारानुसार तपास कऊन, मुळापर्यंत पोहचणे हे कौशल्य असते, हे फार थोडक्यांना माहित असते. त्यावऊन पोलिस दलाने तपास केला तर अवैध शस्त्रs आणि काडतुसामागील रहस्यभेद करण्यास नक्कीच त्यांना लवकरच यश मिळेल, अशी आशा आहे.

-  अमोल राऊत

Advertisement
Tags :

.