महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रोमानियाच्या लिव्हिंग स्टोन्सचे रहस्य

06:55 AM May 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डेथ व्हॅलीशी होते तुलना

Advertisement

जगातील आश्चर्यांमध्ये प्रामुख्याने वास्तूंचा समावेश आहे. या वास्तू सुंदर आणि भव्य आहेत, परंतु निसर्गात एकाहून एक अशी रहस्ये दडलेली आहेत. रोमिनायाच्या कोस्टेस्टी येथील लिव्हिंग स्टोन्स अशाच प्रकारचे एक रहस्य सामावून आहेत. या दगडांना लोक दीर्घकाळापर्यंत चमत्कारी मानत राहिले, मग त्यांना ट्रोवेंट्स म्हटले जाऊ लागले.

Advertisement

ट्रोवेंट शब्द जर्मन संज्ञा सँडेस्टाइन कॉन्क्रीशन्समधून निर्माण झाला आहे. याचा अर्थ सिमेंटप्रमाणे असणारी वाळू असा होतो. हे दगड वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात. परंतु बहुतांश दगडांचा आकार हा अंडाकृती आहे. अनेकदा हे दगड 15 फुटांचे असतात, तर बेबी ट्रोवेंट काही ग्रॅमचे असू शकतात, या दगडांचा आकार प्रारंभी लहान असतो, मग त्यांचा आकार वाढत जातो.

18 व्या शतकात पहिल्यांदा लोकांचे या लिव्हिंग स्टोन्सकडे लक्ष गेल्यावर ते घाबरले. प्रथम त्यांना हे डायनासोरच्या अंड्यांचे जीवाश्म वाटले. मग एलियन पॉड समजले गेले. लिव्हिंग स्टोन्सचे रहस्य उलगडता न आल्याने दीर्घकाळापर्यंत या ठिकाणाच्या आसपास कुठलीच वस्ती निर्माण झाली नाही. स्थानिक लोक या लिव्हिंग स्टोन्सला पारलौकिक शक्तींशी जोडत राहिले.

जगभरातील जियोलॉजिस्टनी या दगडांवर संशोधन केले आहे, परंतु त्यांचा आकार वाढण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. हे 6 दशलक्ष वर्षे जुने दगड असून ते ग्रिटस्टोन्सद्वारे तयार झाल्याचे जीवाश्म शास्त्रज्ञांचे मानणे आहे. पावसावेळी हे दगड अनेक मीटरने वाढतात, या दगडांमध्ये मिनरल सॉल्ट मोठ्या प्रमाणात असू शकते, जे पाण्याशी संपर्क येताच फैलावू लागते अशीही एक थिअरी आहे. परंतु यावरही वैज्ञानिक सहमत होऊ शकलेले नाहीत.

2008 मध्ये ओस्लोमध्ये इंटरनॅशनल जियोलॉजिकल काँग्रेसने ट्रोवेंट्सबद्दल चुकीचा अनुमान व्यक्त करण्यात आल्याचे म्हटले होते. दगडांचा आकार का बदलतोय याचे ठोस कारण या परिषदेलाही देता आलेले नाही. हा दगड 5.3 दशलक्ष वर्षांपूर्वी एखाद्या मोठ्या भूकंपानंतर भूगर्भातून आलेल्या घटकांपासून तयार झाल्याचे मानले गेले आहे.

याच्या परिसरातील भूमी पाहता येथे कधीकाळी समुद्र राहिला असावा असे मत आहे. यासंबंधीचे प्रकाशन नेचर कम्युनिकेशन्समध्ये द जियोलॉजिकल अँड पेलिओन्टोलॉजिकल हेरिटेज ऑफ द बुजाऊ लँड जियोपार्क नावाने 2017 मध्ये प्रकाशित झाले होते. यातही दगडांचा आकार का बदलतोय हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दर हजार वर्षांमध्ये ट्रोवेंट्स 1.5 ते 2 इंचाने वाढतात. दगडामधील आकाराची ही वाढ बल्बसारखी आहे, म्हणजेच यावर एक छोटासा फुगवटा तयार होतो. रोमानियासोबत हे दगड रशिया, कजाकिस्तान आणि चेक प्रजासत्ताकमध्येही आढळून येतात. युनेस्कोने अशा सर्व ठिकाणांना वारसास्थळ घोषित केले आहे.

या दगडांचा केवळ आकार वाढत नाही तर ते सरकतात देखील असे काही जणांचे मानणे आहे. याच्या हालचालींचा अद्याप कुठलाच ठोस पुरावा मिळालेला नाही. परंतु याची तुलना डेथ व्हॅलीच्या दगडांशी होऊ लागली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीतील दगड रहस्यमय आहेत. येथील भरभक्कम दगड आपोआप कित्येक मीटर दूरपर्यंत सरकलेले असतात. सेल्ंिढग स्टोन म्हणवून घेणाऱ्या या दगडांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे, परंतु त्यातील गतीचे कारण अद्याप वैज्ञानिकांना शोधता आलेले नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#Thefaceoftherailwaystation
Next Article