कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंड - वेस्ट इंडिज ‘टी-20’तून ‘स्टॉप क्लॉक’ चाचणीला प्रारंभ

01:05 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

दोन षटकांदरम्यानच्या वेळावर ज्यामुळे निर्बंध येईल त्या ‘स्टॉप क्लॉक’ चाचणीला वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील ‘टी-20’ मालिकेपासून सुरुवात होईल, असे ‘आयसीसी’ने सोमवारी सांगितले आहे. बार्बाडोस येथे आज मंगळवारी होणार असलेल्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याने ही चाचणी सुरू होईल.

Advertisement

‘स्टॉप क्लॉक’ पद्धत दोन षटकांदरम्यान घेतल्या जाणाऱ्या वेळेवर मर्यादा आणेल. याचा अर्थ गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक षटक पूर्ण झाल्यानंतर पुढील षटकाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी 60 सेकंदात सज्ज व्हावे लागेल, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. एका डावात दोन इशाऱ्यांनंतर तिसऱ्यांदा मर्यादा पाळण्यात अयशस्वी झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड सहन करावा लागेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाचा वेग वाढवण्याचे मार्ग आम्ही सतत शोधत असतो. निर्धारित वेळेत अंतिम षटकाचा पहिला चेंडू टाकण्याच्या स्थितीत नसल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फक्त चार क्षेत्ररक्षकांना वर्तुळाच्या बाहेर ठेवण्यास अनुमती देणारा आणि 2022 मध्ये लागू केलेला नवीन नियम यशस्वी झाल्यानंतर आता पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘स्टॉप क्लॉक ट्रायल’ आणली गेली आहे. या पद्धतीच्या निकालांचे मूल्यमापन चाचणी कालावधीच्या शेवटी केले जाईल, असे ‘आयसीसी’चे सरव्यवस्थापक (क्रिकेट) वसिम खान यांनी सांगितले आहे.

Advertisement
Next Article