For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लवकरच येतोय ‘कोहरा’चा दुसरा सीझन

06:01 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
लवकरच येतोय ‘कोहरा’चा दुसरा सीझन
Advertisement

मोना सिंहची सीरिजमध्ये एंट्री

Advertisement

सुदीप शर्माकडून निर्मित क्राइम ड्रामा ‘कोहरा’ ही सीरिज मागील वर्षी ओटीटीवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये वरुण सोबती आणि सुविंदर विक्की हे कलाकार दिसून आले होते. आता निर्मात्यांनी या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहेस. या सीझनमध्ये आता अभिनेत्री मोना सिंहची एंट्री झाली आहे.

नेटफ्लिक्सने एक पोस्ट शेअर केली असून यात मोना सिंह आणि वरुण सोबती दिसून येत आहेत. याचबरोबर कॅप्शनमध्ये ‘एक नवे रहस्य, एक नवा तपास लवकरच धुके दूर होईल. कोहरा सीझन 2 लवकरच येतोय केवळ नेटफ्लिक्सवर’ असे नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

कोहरा ही सीरिज एका एनआरआयच्या मृत्यूच्या तपासावर आधारित होती. पोलीस एनआरआयच्या मृत्यूचे रहस्य दूर करत असल्याचे दाखविण्यात आले होते. या सीरिजमध्ये सुविंदर विक्की, वरुण सोबती, वरुण बडोला आणि हरलीन सेठी समवेत अनेक कलाकार दिसून आले होते. मोना सिंह यापूर्वी मुंज्या या चित्रपटात दिसून आली होती. तर त्यापूर्वी तिने लाल सिंह चड्ढा या चित्रपटात आमिर खानसोबत काम केले होते.

Advertisement
Tags :

.