60 वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे दुसरा ‘चंद्र’
वैज्ञानिकांनी लावला शोध...आणखी 60 वर्षे राहणार
पृथ्वीकडे चंद्राच्या व्यतिरिक्त आणखी चंद्र असू शकतात का? अलिकडेच वैज्ञानिकांनी एक नवा ‘क्वासी-मून’चा शोध लावला आहे. याचे नाव 2025 पीएन7 आहे. हा छोटासा एस्टेरॉयड पृथ्वीसोबत सूर्याला प्रदक्षिणा घालत आहे. परंतु प्रत्यक्षात हा पृथ्वीच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत नाही. हा शोध आमचे सौरमंडळ किती रहस्यमय आहे दर्शविणारा आहे.
क्वासी-मून एकप्रकारचा लघूग्रह असतो, जो पृथ्वीसोबत सूर्याभवती फिरतो. पृथ्वीचा जणू चंद्र असल्याप्रमाणे तो वाटतो, परंतु प्रत्यक्षात हा सूर्याच्या कक्षेत आहे. हा गुरुत्वाकर्षणाचा एक खेळ आहे. प्लेनेटरी सोसायटीनुसार हा एस्टेरॉयड पृथ्वीसोबत अस्थायी प्रवास करतो, नेहमी सोबत राहत नाही.
हा एस्टेरॉयड 2 ऑगस्ट 2025 रोजी हवाईच्या हेलाकाला वेधशाळेत पॅन-स्टार्स1 टेलिस्कोपद्वारे पहिल्यांदा पाहिला गेला. परंतु जुन्या आर्काइव्ह डाटाद्वारे हा 2014 पासून दिसत होता, असे कळते. फ्रेंच पत्रकार आणि एमेच्योर खगोलशास्त्रज्ञ एड्रियन कोफिनेट यांनी याचे सर्वप्रथम विश्लेषण केले. त्यांनी माइनर प्लॅनेट मेलिंग लिस्टवर 30 ऑगस्ट रोजी हा पृथ्वीचा क्वासी-सॅटेलाइट असल्याची पोस्ट केली.
माद्रिदच्या कॉम्प्लुटेंस युनिव्हर्सिटीतील अध्ययनाचे सह-लेखक कार्लोस डे ला फुएंटे मार्कोस यांनी हा छोटा, मंद आणि पृथ्वीवरून दिसण्याजोगा नसल्याने इतक्या वर्षापर्यंत दुर्लक्षित राहिल्याचे सांगितले. हा शोध अमेरिकन एस्ट्रानॉमिकल सोसायटीच्या रिसर्च नोट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने याविषयी अधिसूचना जारी केली असून यात 30 जुलैपासूनचा डाटा होता.
याचा आकार अन् वैशिष्ट्यो
2025 पीएन7 चा व्यास केवळ 19 मीटर असून तो 2013 मध्ये रशियाच्या चेल्याबिंस्क येथे कोसळलेल्या उल्कापिंडापेक्षा काही प्रमाणात छोटा आहे. याची चमक मॅग्निट्यूड 26 आहे, म्हणजेच हा अत्यंत मंद आहे, नुसत्या डोळ्यांनी दिसणारे तारे मॅग्निट्यूड 6 किंवा त्यापेक्षा कमी असतात, सर्वात चमकणारा तारा सीरियस उणे 1.5 चा आहे, यामुळे याला दुर्बिणीतूनच पाहिले जाऊ शकते. हा लघूग्रह पृथ्वीपासून 4.5 दशलक्ष ते 60 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असतो, हा आर्जुना एस्टेरॉयड बेल्टमधून आला आहे. याचा वेग पाहता तो कॅप्चर्ड एस्टेरॉयड असल्याचे कळते. हा पृथ्वीसोबत 1:1 रेजोनेन्सध्ये आहे, म्हणजेच एकाचवेळी सूर्याला प्रदक्षिणा घालत असतो.
इतके वर्षे दुर्लक्षित का?
हा छोटा, कमी चमकणारा आणि पृथ्वीवरून दिसण्याजोगा नाही. याचमुळे दशकांपर्यंत तो दिसून आला नाही. परंतु आता वेरा सी. रुबिन वेधशाळेसारखी नवी उपकरणे अशा ऑब्जेक्टला शोधू शकतात. हा लघुग्रह 1960 च्या दशकापासून पृथ्वीसोबत आहे, हा पृथ्वीकरता धोकादायक नाही, परंतु वैज्ञानिकांसाठी याच्या माध्यमातून अध्ययनाची चांगली संधी आहे.
भविष्यात काय घडू शकते?
2025 पीएन7 प्रमाणेच आणखी क्वासी-मून असू शकतात. रुबिन वेधशाळा अशाप्रकारचे अनेक शोध लावू शकते. सर्वात प्रसिद्ध क्वासी-मून कामो ओआलेवा (2016 एचओ3) असून त्याचा व्यास 40-100 मीटर आहे. चीनचे टियांवेन-2 मिशन याचे नमुने 2027 पर्यंत पृथ्वीवर आणणार आहे. यामुळे सौरमंडळाच्या उत्पत्तिविषयी माहिती मिळू शकणार आहे.