हरवलेल्या शहराचा शोध
दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये पुरातत्व तज्ञांनी अत्यंत महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. पुरातत्वतज्ञांना येथे एक प्राचीन शहर मिळाले असून ते बरांका प्रांताच्या उत्तर भागात आहे. सुमारे 3500 वर्षे जुन्या या शहराचे नाव पेनिको आहे. प्रारंभिक संशोधनात हे शहर एकेकाळी व्यापाराचे मोठे केंद्र होते. हे प्रशांत किनाऱ्यावरील समुदायांना अँडीज पर्वत आणि अमेझॉन खोऱ्याला जोडत होते. या शोधामुळे कॅरल संस्कृतीविषयी नवी माहिती मिळू शकणार आहे. पॅरल ही अमेरिकेची सर्वात जुनी संस्कृती मानली जाते.
पेनिको शहर पेरूची राजधानी लीमापासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. शहराच्या मध्ये गोल संरचना असून ते एक पर्वतावर निर्मित आहे. याच्या चहुबाजूला दगडी अन् मातीच्या इमारती आहेत. हे शहर ख्रिस्तपूर्व 1800 ते 1500 सालादरम्यान निर्माण करण्यात आले होते.
8 वर्षापर्यंत संशोधन
8 वर्षांच्या संशोधनात 18 इमारती मिळाल्या आहेत. या इमारतीमध्ये मार्तीच्या मूर्ती आणि हार मिळाले. पेनिको शहर कॅरल नजीक आहे. कॅरल ही संस्कृती 5000 वर्षांपूर्वी सुपे खोऱ्यात विकसित झाली होती. याला पॅरल-सुपे संस्कृतीही म्हटले जाते. पॅरलमध्ये 32 स्मारकं असून यात पिरॅमिड, सिंचन प्रणाली आणि शहर सामील आहे.