बोगस कामगार कार्डांचा शोध जारी
कामगारमंत्री संतोष लाड यांच्याकडून उत्तर
बेळगाव : बोगस कामगार कार्ड शोधून ती रद्द करण्यात येत आहेत, अशी माहिती कामगारमंत्री संतोष लाड यांनी विधानसभेत दिली. हिरेकेरुरचे आमदार यु. बी. बनकार यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.कामगार खात्याच्या अखत्यारित काम करणाऱ्या कर्नाटक राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळ, कर्नाटक राज्य असंघटित कामगार सामाजिक सुरक्षितता मंडळ, आंबेडकर कामगार साहाय्य योजना आणि विविध मंडळांना लग्न, प्रसूती, अपघात व मासिक वेतन योजनेंतर्गत मदत करण्यात येत असल्याचे कामगार मंत्र्यांनी सांगितले.बोगस कामगार कार्ड शोधून ते खरोखरच कामगार आहेत की नाही? याची जागेवर जाऊन पाहणी करून खात्री करून घेण्याची सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे, असे सांगत कामगार मंत्र्यांनी आपल्या खात्यांतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.