For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात भीतीदायक शहर

06:42 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वात भीतीदायक शहर
Advertisement

लोक स्वत:चेच भूत खरेदी करण्यासाठी रांगेत

Advertisement

तुम्ही अनेक भुताटकीयुक्त घरे किंवा वाड्यांविषयी ऐकले असेल. परंतु तुम्ही कधीच भुताटकीयुक्त शहरांविषयी ऐकले आहे का? या अनोख्या मेंहर शहरात दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येत असतात. पुरातन वास्तुकलेचा नमुना म्हणून प्रसिद्ध या शहरात 350 पब आहेत. युकेचे यॉर्क शहर जगातील सर्वात भीतीदायक शहर म्हणून ओळखले जाते. 2002 साली घोस्ट रिसर्च फौंडेशन इंटरनॅशनलने जगातील सर्वात भीतीदायक शहर म्हणून याची घोषणा केली होती.

या शहरात जुन्या इमारतींची संख्या भरपूर असून यात 12 व्या शतकातील नॉर्मन हाउस आणि 1316 मध्ये निर्मित लेडीज रो सामील आहे. परंतु येथील भिंतींमागे भूतांचा वास असल्याचे मानले जाते. येथे येणारे अनेक लोक येथील काही जागा रोमांचित करत असल्याचे मानतात.

Advertisement

एक गल्ली अशी देखील आहे, जेथे गर्दी असते आणि अनेक लोक रांगेत उभे दिसून येतात. या रांगेत लोक स्वत:साठीच भूतांना खरेदी करण्यासाठी उभे असतात. प्रत्यक्षात येथे जगात सर्वात खास हाताने निर्मित, स्थानिक पदार्थांनी तयार केलेल्या स्मरणीय वस्तूंची विक्री होते. या वस्तूंना भूताटकीयुक्त स्मृतिचिन्ह म्हणून खरेदी करण्यात येते.

या गल्लीत एक खास इमारत असून ती 1780 साली निर्माण करण्यात आली होती. याच्या तळमजल्याचा सामग्रीच्या विक्रीसाठी तर वरच्या मजल्याचा वर्कशॉपप्रमाणे वापर होतो. येथे तुम्ही स्वत:चे भूत तयार करवून घेऊ शकतात. याचबरोबर येथे तुम्ही अजब हिस्स्यांसोबत रहस्यमय परंतु सुंदर चित्रेही पाहू शकता. येथील गल्ल्यांमध्ये अशाप्रकारची भूतं फिरत असतात असे बोलले जाते.

Advertisement
Tags :

.