महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खाणींचा 35 हजार कोटींचा घोटाळा राहिला कागदावरच

11:50 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दहा वर्षांनतरही चौकशी अपूर्णावस्थेत

Advertisement

पणजी : सुमारे 10 वर्षांपूर्वी बेकायदा खाण प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली होती, तथापी आता त्या पथकातील बहुतेक अधिकारी इतरत्र बदली होऊन गेल्यामुळे तपासकाम थंडावले आहे. कर्मचारी वर्ग, साधनसामग्री नसल्यामुळे यापुढेही काहीच निष्पन्न होणार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऊ. 35 हजार कोटींचा खाण घोटाळा कागदावरच राहिला असून प्रत्यक्षात कोणालाच शिक्षा झालेली नसल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2013 मध्ये एसआयटी नेमण्यात आली, तेव्हा तिथे पाच सदस्य होते. आता त्या पथकात केवळ एकच सदस्य शिल्लक राहिला असून तो एकटा काहीच कऊ शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. एसआयटीमध्ये चार पोलीस निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाचा समावेश होता. पोलीस उपमहासंचालक हे त्या पथकाचे प्रमुख होते. या एसआयटीकडे 16 प्रकरणे (बेकायदा खाण उद्योग) दाखल करण्यात आली. त्यातील काही प्रकरणे बंद झाली तर काही प्रकरणांचा तपासच होऊ शकलेला नाही. पुरावे नसल्याने अनेक प्रकरणे बंद करावी लागली आहेत. काही किरकोळ प्रकरणात आरोपपत्र दाखल झाली असली तरी पुढे मात्र एसआयटीला काहीच करता आले नाही. एसआयटी स्थापनेचा मूळ हेतूच आता संपुष्टात आला असून 10 वर्षे उलटली तरी चौकशी पूर्ण होत नाही. अटक व कारवाई होत नाही, परिणामी एसआयटी वाया गेल्यात जमा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article