वारं फिरलंय म्हणणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली
आमदार प्रकाश आबिटकर : पदयात्रेला जनतेतून वाढता प्रतिसाद : विरोधक घायाळ
कोल्हापूर :
पदयात्रेमध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पदयात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून वारं फिरलय म्हणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच विरोधक बेताल वक्तव्य करू लागले आहेत. जनताच त्यांना मतपेटीतून उत्तर देईल असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते कसबा तारळे येथे कोपरा सभेत बोलत होते.
दोन्ही विधानसभा निवडणुकीत तारळेंकरांनी मोठं मताधिक्य दिले आहे. यामधून उतराई होणे अशक्य आहे. यापुढेही तारळे गावच्या विकासासाठी कटीबद्ध राहिन असे सांगून आ. आबीटकर म्हणाले, अभ्यास करून विकासाचा पेपर सोडविला तर राधानगरी मतदार संघाचे उदाहरण द्यावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून पीएम किसानच्या धर्तीवर सीएम किसान योजना, 7.5 एचपी पर्यंत मोटरपंपाना मोफत वीज, मुलींना मोफत उच्य शिक्षणाची सोय, लाडकी बहीण, वयोश्री योजना यांसारख्या विविध योजना राबवील्यामुळे समाजातील सर्व घटक समाधानी आहेत. धामणी प्रकल्पाची मुख्यमंत्री यांच्या हस्ते घळभरणी झाली यामुळे शेतकरी आनंदी आहेत.
यावेळी भाजपचे व्हि. टी. जाधव म्हणाले, आमदार आबीटकर यांनी गटतट न पाहता काम केले. प्रत्येक माणसाचे काम केले. विरोधात असलेले लोक देतील आमदार आबीटकरांना मदत करून विकासाला बळ द्यायचे आहे असे खासगीत बोलतात. तेजस्विनी पाटील म्हणाल्या आ.आबीटकर यांनी उपजिल्हा रुग्णालय केल्यामुळे राधानगरी व गगन बावडा परिसरातील सुमारे 50 खेड्यातील गोरगरीब रुग्णांची सोय होणार आहे.
यावेळी संभाजी आरडे, रविश पाटील-कौलवकर, अभिषेक डोंगळे, देवराज बारदेस्कर, उमेश पाटील, सातापा कांबळे, उपसरपंच संदीप पाटील, बळवंत किरूळकर, अमर पाटील, अशोक सरनोबत, रमेश साबळे, चंद्रकांत पाटील, नितीन पोतदार आ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीधर चव्हाण यांनी केले. आभार नितीन पोतदार यांनी मानले.
उपजिल्हा रुग्णालयाची वास्तू वर्षभरात उभी राहिल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्यामुळे कसबा तारळे येथील उपजिल्हा रुग्णालयास सुमारे 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वर्षभरात अद्यावत इमारत उभी राहिल असे आमदार आबिटकर यांनी सांगितले.