For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग नवीन पिढीने विसरू नये!

12:56 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग नवीन पिढीने विसरू नये
Advertisement

क्रांतिदिन सोहळ्यात मंत्री रवी नाईक यांचे आवाहन

Advertisement

फोंडा : पोर्तुगिजांच्या शेकडो वर्षांच्या दडपशाहीला 18 जून 1946 या दिवशी मडगावच्या लोहिया मैदानावऊन थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी आव्हान दिले. गोवा मुक्तीलढ्याच्या पर्वाला कलाटणी देणारा खऱ्या अर्थाने हा ऐतिहासिक दिवस होता. साडेचारशे वर्षांच्या जुलुमी राजवटीतून गोवा मुक्त होण्यामागे असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आहे. हा इतिहास नवीन पिढीने विसऊ नये, असे आवाहन फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी क्रांतिदिन सोहळ्यात बोलताना केले.फोंडा तालुक्यातील शासकीय पातळीवरील क्रांतिदिन सोहळा मंगळवारी सकाळी येथील क्रांती मैदानावर साजरा करण्यात आला. मंत्री रवी नाईक यांच्याहस्ते येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून मुक्तीलढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच फोंडा पोलीस पथकातर्फे मानवंदना देण्यात आली. फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार रोहिदास नाईक तसेच सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी, सरकारी अधिकारी व अन्य मान्यवरांकडूनही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर तेरा वर्षांनी पोर्तुगीज आमदानीतून गोवा मुक्त झाला. उशिरा स्वतंत्र होऊनही आज या छोट्या राज्याने सर्वच क्षेत्रात गतिमान प्रगती व चौफेर विकास साधलेला आहे. परकीय राजवटीतून गोवा मुक्त झाल्यानेच आज आपण विकासाची फळे चाखू शकलो. त्यामागे असलेले स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान विसरता येणार नाही, असेही मंत्री रवी नाईक यांनी पुढे बोलताना नमूद केले. फोंड्यातील क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असून सैनिकी प्रशिक्षण केंद्राच्या ताब्यात असलेली ही जागा त्यावेळचे संरक्षणमंत्री शरद पवार यांच्याशी वाटाघाटी कऊन मिळवली होती. या जागेत फोंड्यातील नागरिकांसाठी प्रशस्त असे बहुउद्देशीय उद्यान उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी उर्वरीत जागाही ताब्यात घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात आल्याचे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले. मुख्य कार्यक्रमानंतर लोकविश्वास प्रतिष्ठान ढवळी, इंदिराबाई ढवळीकर हायस्कूल ढवळी, सरकारी हायस्कूल सदर फोंडा, एमआयबीके हायस्कूल खांडेपार, डॉ. हेडगेवार हायस्कूल फोंडा आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रंचालन गिरीश वेगळेकर यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.