For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...‘आयफोन 17’ साठी झुंबड

06:38 AM Sep 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
   ‘आयफोन 17’ साठी झुंबड
Advertisement

मुंबईतील बीकेसीत रात्री उशिरापर्यंत अॅपल स्टोअरमध्ये रांगा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुंबईतील बीकेसी जिओ सेंटरबाहेर अॅपल स्टोअरमध्ये काही लोकांमध्ये पहिला आयफोन आपल्याला मिळावा यासाठी ग्राहकांमध्ये मोठी झुंबड उडाली. दरम्यान ग्राहकांत हाणामारी झाली, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना यात हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त करावे लागले. अॅपलने शुक्रवारी 19 सप्टेंबरपासून आयफोन 17 मालिकेच्या नवीन स्मार्टफोनची विक्री सुरू केली आहे. मुंबईतील बीकेसी स्टोअरबाहेर आयफोन खरेदी करण्यासाठी मोठ्या गर्दीत काही लोकांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना मध्यभागी यावे लागले. लोक आयफोन 17 खरेदी करण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत होते. या संदर्भात पाहता, भारतातील अॅपलच्या सर्व अधिकृत स्टोअरमध्ये 18 रोजी रात्री उशिरापासून गर्दी दिसून आली आहे.

Advertisement

कंपनीने 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या वार्षिक कार्यक्रम ‘ओव ड्रॉपिंग‘ मध्ये आयफोन 17 मालिका लाँच केली होती. त्यात आयफोन 17, आयफोन एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स यांची घोषणा केली होती. मुंबईतील बीकेसी स्टोअरबाहेर रात्री उशिरापासूनच लेटेस्ट आयफोन मॉडेल खरेदी करण्यासाठी रांग लागली होती. दिल्लीतील अॅपल स्टोअरबाहेर लोक आयफोन खरेदी करण्यासाठी रांगेत उभे होते.

ऑनलाइन खरेदीची संधी

तुम्ही नवीन आयफोन ऑनलाइन देखील ऑर्डर करू शकता. नवीन आयफोन मालिका कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅपल स्टोअरवरून ऑर्डर करता येतो. सदरचा फोन फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून देखील खरेदी करता येतो.

सर्वात स्लिक आयफोनची किंमत 1.20 लाख रुपये

आयफोन 17 सिरीजची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये आहे. त्याच वेळी, आयफोन एअर हा कंपनीचा सर्वात स्लिक फोन आहे. त्याची सुरुवातीची किंमत 1.20 लाख रुपये आहे. याशिवाय, एअरपॉड्स 3 प्रो सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये रिअल-टाइम ट्रान्स्लेशन फीचर मिळेल. हृदय गती सांगणारे हे पहिले वायरलेस इअरबड्स आहेत. ते जगातील सर्वोत्तम इन-इअर अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन देते. त्याची किंमत 25,900 रुपये आहे.

Advertisement
Tags :

.