महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली विमानतळावरील टर्मिनल-1 चे छत कोसळले

06:13 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1 ठार, 9 जखमी : अनेक गाड्या अडकल्या

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 वरील छत कोसळून शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले असून एकाला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर पोलिसांनी भादंवि कलम 304 ए/337 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या दुर्घटनेनंतर पहिल्याच दिवसापासून चर्चेत असलेला दिल्ली विमानतळाचा टर्मिनल-1 पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या अपघाताला खरे जबाबदार कोण, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. या अपघाताबाबत भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत राजकीय चिखलफेक केली आहे. तर, दुसरीकडे आम आदमी पक्षाने विमानतळ टर्मिनसच्या संपूर्ण बांधकाम कामाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

टर्मिनल-1 येथे झालेल्या दुर्घटनेनंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालक, नागरी विमान वाहतूक ब्युरो आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी अडचणीत आले आहेत. सदर विभागांनी काही महिन्यांपूर्वी या टर्मिनलला प्रवासी उ•ाण संचालनासाठी ग्रीन सिग्नल दिला होता. तसेच एकीकडे हे विमानतळ काँग्रेसच्या कारकिर्दीत 2009 मध्ये बांधण्यात आल्याचा दावा भाजपने केला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला हिरवा कंदील दाखवल्याचा प्रतिदावा काँग्रेसने केला आहे.

तब्बल सात वर्षांच्या विस्तारीकरणाच्या कामानंतर टर्मिनल-1 ला नवे रूप देण्यात आले होते. या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान या टर्मिनलचे सर्व कमकुवत भाग दुऊस्त करून मजबुतीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या वषीच्या पहिल्या पावसातच छत कोसळल्यामुळे सदर काम करणारी यंत्रणा आरोपांच्या गर्तेत अडकली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article