पृथ्वीला आकार देण्यात जीवजंतूंची भूमिका महत्त्वाची
603 पैकी 30 प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर
प्राणी केवळ निसर्गाचा हिस्सा नसून ते याच्या निर्मितीत आणि आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या अध्ययनात विविध जीवजंतू कशाप्रकारे आमच्या पृथ्वीच्या वातावरणाला प्रभावित करतात हे सांगण्यात आले आहे. विशाल वाळवी, पाणघोडे जे पाणी बाहेर सोडण्याची प्रणली तयार करतात आणि बीवर जे दलदलयुक्त भूमी तयार करतात ती अंतराळातून दिसून येऊ शकते. संबंधित अध्ययन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाले आहे.
हे अध्ययन अशाप्रकारचे पहिले जागतिक विश्लेषण आहे, ज्यात 603 प्रजातींच्या समुहांची ओळख पटविण्यात आली आहे, जे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या प्रक्रियांना प्रभावित करतात. यात छोटे किडे, जे मातीची संरचना बदलतात, त्यांच्यापासून नदीच्या तळाला नवा आकार देणाऱ्या सॅल्मन माशांचा देखील समावेश आहे. ओळख पटविण्यात आलेल्या 30 टक्क्यांपेक्षा अधिक प्रजाती दुर्लभ, स्थानिक किंवा विलुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे अध्ययनात म्हटले गेले आहे. याचा अर्थ त्यांच्याकडून संचालित भू-आकृतीसंबंधी प्रक्रिया पूर्णपणे समजून घेण्यापूर्वीच त्यांचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते, यामुळे पर्यावरणीय व्यवस्थेवर गंभीर प्रभाव पडणार आहे.
छोट्या-छोट्या जीवांचे महत्त्व
वाळवी : ब्राझीलध्ये वाळवी विशाल ढिगाऱ्यांचे नेटवर्क तयार करतात, ज्यातील काही तर हजारो चौरस किलोमीटरपर्यंत फैलावलेले असतात.
सॅल्मन मासा : याच्या प्रजननादरम्यान तळाचे इतके अधिक स्थानांतरण होते, जे वार्षिक पूरासमान असू शकते.
मुंग्या : या छोट्या असल्या तरीही स्वत:च्या निरंतर हालचालींमुळे मातीची संरचना आणि जल निकासी प्रणालीत मोठा बदल घडवून आणतात.
प्राण्यांचे योगदान केवळ पर्यावरणीय व्यवस्था कायम राखण्यापुरती मर्यादित नसूत ते पृथ्वीचा पृष्ठभाग आणि याच्या परिदृश्यांना आकार देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे या नैसर्गिक इंजिनियर्सची सुरक्षा संपूर्ण पृथ्वीच्या संतुलनासाठी आवश्यक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.