श्रमदानातुन किल्ले प्रतापगडाच्या ऐतिहासिक तटबंदिचा रस्ता खुला
श्रीमती याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा
सातारा
युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादित नामांकन पुर्व तयारीच्या अनुशंघाने किल्ले प्रतापगड या ठिकाणी स्वच्छता ही सेवा उपक्रम अंतर्गत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन मॅडम यांचे हस्ते करणेत आले. यावेळी ग्रामस्थ.कर्मचारी शालेय विद्यार्थीय़ुवक मंडळे .हिलदरी संस्था.गाईड संघटना व हाॅटेल संघटना संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कुंभरोशी यांच्या वतीने किल्ल्याचा सर्व परिसर स्वच्छ करणेत आला. यावेळी केलेल्या श्रमदानातुन पाच कि.मी.चा तटबंदी लगतचा मार्ग स्वच्छ करणेत आला. या स्वच्छतेमुळे पर्यटकांना सर्व किल्ला पाहता येणार आहे. तसेच किल्ल्यावरील ग्रामस्थांशी संवाद साधताना मा.मुकाअ याशनी नागराजन म्हणाल्या कि किल्ले प्रतापगडाची जागतिक वारसा स्थळा मध्ये मानांकन मिळणे हि सातारा जिल्हयाच्या दृष्टिने अभिमानाची गोष्ट आहे.
किल्लयांच्या स्वच्छतेत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. जागतिक वारसास्थळा मध्ये या किल्लयाचा सामावेश होणेचे दृष्टिने गावातील व परिसरातील सर्व नागरिकांनी येणा-या युनेस्कोच्या समितीशी माहितीपुर्ण संवाद साधावा. हा किल्ला आपल्या इतिहासाचा वैभवशाली वारसा आहे त्यामुळे सर्वांनीच त्याचे सौंदर्य व ऐताहिसकतेला बाधा येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.यावेळी याशनी नागराजन मॅडम यांनी किल्लयावरील बुरुज.तटबंदी.व शिवकालीन पाण्याच्या तळ्याची पहाणी केली.
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत एक दिवस स्वच्छतेसाठी या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ किल्ले प्रतापगड येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांचे उपस्थितीत पार पाडला यावेळी पाणी व स्वच्छतेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे मॅडम गटविकास अधिकारी अरुण मरबळ साहेब. सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव कांबळे साहेब. कुंभरोशी सरपंच कांचन सावंत.
गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे. बांधकाम उपअभियंता संजय जाधव पाणीपुरवठा उपाभियंता संजय भोसले पशुधन अधिकारी कविता खोसे तालुका तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रज्ञुम्न बुलाख उपस्थितीत होते.
यावेळी गाईड सामजिक संघ. वन व्यवस्थापन समिती. किल्ले प्रतापगड सर्व ग्रामस्थ. जय भवानी जय भवानी महिला बचत गट किल्ले प्रतापगड पारसोंड व शिरवली केंद्रातील सर्व शाळा महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शाळा तसेच छत्रपती हायस्कूल एज्युकेशन शिरवली या सर्व ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून तटबंदीचा रस्ता श्रमदानातून स्वच्छ करून खुला करण्यात आला. श्रमदानातुन झालेल्या या कामामुळे पर्यटकांना ज्याठिकाणी बुरज पाहणी करता जाता येत नव्हते त्याठिकाणी जाता येणार आहे. स्वच्छता हि सेवा या मोहिमे अंतर्गत करणेत आलेलंया या श्रमदानामुळे विद्यार्थी व नागरीक यांचे मध्ये वैयक्तिक व सांर्वजनिक स्वच्छतेचया जाणिवा जागृत करणेस मदत होणार आहे. यावेळी शिक्षण विभागाचंया वतीने वकतृत्व स्पर्धा.चित्रकला स्पर्धा.निबंध स्पर्धा घेणेत आल्या. तसेच हिलदरी संस्थेच्या वतीने ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे प्रात्यक्षीत बचतगटांच्या महिलांना व ग्रामस्थांना करुन दाखवले.
यावेळी कुंभरोशी सरपंच कांचन सावंत. उपसरपंच ज्योती जंगम . विलास मोरे.वन समिती अध्यक्ष. चंद्रकांत उत्तेकर. शिवकालीन खेडे.अध्यक्ष. आनंद उतेकर.अध्यक्ष गाईड सामाजिक संस्था. ग्राप सदस्य अमोल जंगम.पोलिस पाटिल सतिश जंगम.ग्रामस्थ महादेव कासुर्डे.विलास जाधव. कादर सय्यद.धनजय जंगम. दुर्ग संघटणेचे पदाधिकारी हिलदारी संस्थेचे कर्मचारी राम भोसले.अश्विनी राऊत.प्रतिमा बोडरे, खाकसर अलि पटेल.गौरी चव्हाण.अनुराग खरे.अभिषेक खरे.स्वाती सपकाळ. स्वच्छता विभागाचे जिल्हा तज्ञ धनाजी पाटिल व अजय राऊत विस्तार अधिकारी सुनिल पार्टे. आप्पा जाधव. सुनिल चिकणे. बि.आर.सि.विशाल घाडगे ग्रामसेवक मानिक माळवे . सर्व किल्ले प्रतापगड ग्रामस्थ. सर्व ग्रामसेवक .सर्व शिक्षक. आरोग्य सेवक. सि.आर.पी. आशा सेविका आंगणवाडी सेविका उपस्थित होते.या वेळी मॅप्रो कंपनीने स्वच्छतेचे साहित्य.ग्लोज ई व सकाळचा अल्पोपहार विद्यार्थ्याना दिला तर हाॅटेल सह्याद्रि यांनी विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवनाची सोय केली होती. हिरदरी व संयुक्त वन समिती यांनी स्वच्छतेचे साहित्य खराटे .फावडे.इ दिले होते