महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विजयनगर साई मंदिरसमोरील रस्त्याची दुर्दशा

11:06 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनेकवेळा तक्रारी देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष

Advertisement

बेळगाव : विजयनगर, पहिला स्टॉप येथील पाईपलाईन रोडची दुर्दशा झाली आहे. विशेषत: साई मंदिरसमोरील रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. याबाबत कित्येक वेळा तक्रारी देऊनदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विजयनगर प्रवेशद्वारावरच ही समस्या कायम बनली आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरून पाईपलाईन रोडमार्गे चढतीला जाणाऱ्या मार्गावर ही समस्या निर्माण झाल्याने वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. पावसामुळे परिस्थिती आणखीच गंभीर बनू लागली आहे. वाहने घसरून अपघातही घडू लागले आहेत. ग्रा. पं. आणि मनपाच्या सीमेवर हा रस्ता असल्याने याकडे सातत्याने दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Advertisement

उखडलेल्या रस्त्यातून ये-जा करणे त्रासदायक

या उखडलेल्या रस्त्यातून ये-जा करणे त्रासदायक ठरणार आहे. शिवाय या उखडलेल्या रस्त्यासमोरच सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे गणेशभक्तातूनही संताप व्यक्त होत असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article