कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli Politics : ईश्वरपुरात महायुतीतील तिढा अद्याप सुटेना..!

04:24 PM Nov 13, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                          ईश्वरपूरमध्ये महायुती उमेदवारांच्या बैठकीत तिढा कायम

Advertisement

ईश्वरपूर : उरुण ईश्वरपुर नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अद्याप मिटेना. गेल्या आठ-दहा बैठकांच्या फैऱ्या सुरु आहेत. शहरात बैठका सुरु असतानाच भाजपा पदाधिकारी उमेदवारीचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी मुंबईत पोहचले असल्याचे समजते. अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात होवून ही तिढा न सुटल्याने इच्छुक उमेदवारात अस्वस्थता आहे. अशातच डावलल्याने व नेत्यांनी हिरवा कंदिल न दाखवल्याने दोन्ही गटाकडून इनकमिंग व आऊट गोईंग सुरु झाले आहे.

Advertisement

भाजपा, शिवसेना शिंदे गट, व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे महायुतीतील प्रमुख पक्ष आहेत. यामध्ये भाजपातील अंतर्गत गट वाढले आहेत. त्यामुळे उमेदवारी-साठी या गटात मोठी रस्सीखेच आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील हे ठराविक प्रभाग व जागांसाठी आग्रही आहेत. त्यातच रयत क्रांती संघटनेचे संस्-थापक आ. सदाभाऊ खोत यांचा ही काही जागांवर दावा आहे. नगराध्यक्ष पदासह ३१ जागा आणि इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अद्याप तिढा सुटलेला नाही.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक हे मंगळवारी हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचे समजते. मुंबईत मंगळवारी रात्री बैठक होवून मार्ग निघेल, अशी अपेक्षा महायुतीतील पदाधिकारी व इच्छुकांना होती. मात्र बुधवारी रात्री पर्यंत कसलाच तोडगा निघालेला नाही. दरम्यान, शहरात भोसले-पाटील, पवार यांच्यासह भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. तरीही घोडं नेमकं कुठं आडलयं, हे समजू शकत नाही.

इच्छुक उमेदवार अस्वस्थ तर शहरवासीयांत महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाचे उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांशी उमेदवार आ.जयंत पाटील व त्यांच्या श्रेष्ठींनी निश्चित केले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांच्यासह काही प्रभागातील सिंग्नल मिळालेल्या उमेदवारांनी प्रचारही सुरु केला आहे. मलगुंडे यांनी मतदारांच्या संपर्काबरोबर शहरात त्यांचा आवाजी प्रचार ही सुरु झाला आहे. महायुतीतून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांच्यासह प्रभाग १३ मधून माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांच्या पत्नी अनिता ओसवाल यांनी गेल्या आठवड्यापासूनच प्रचार सुरु केला आहे.

Advertisement
Tags :
#BJP #Shivsena #NCP#CandidateFiling#ElectionUpdates#IshwarpuraMunicipalElection#mayorelection#MunicipalElectionsLocalGovernance
Next Article