जगातील सर्वात मोठ्या नावाचा विक्रम
700 हून अधिक अल्फाबेट
तुमचे नाव इतके मोठे असेल की ते पूर्ण वाचण्यास अनेक मिनिटे लागत असतील तर काय होईल याचा विचार करा. हे विचित्र वाटू शकते. परंतु जगात एक असा इसम होता, ज्याच्या नावावर 700 हून अधिक अक्षरांचा वापर करण्यात आला होता. ह्यूबर्ट ब्लेन वोल्फस्चलेगेलस्टीनहॉसेनबर्गरडॉर्फ सीनियर नावाच्या या व्यक्तीचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठे नाव म्हणून नोंद आहे.
ह्यूबर्टचा जन्म 4 ऑगस्ट 1914 रोजी जर्मनीत झाला होता आणि त्याचे निधन 24 ऑक्टोबर 1997 रोजी अमेरिकेच्या पेंसिलवेनियात झाले होते. याचे मोठे नाव असण्यामागील कारण परंतु अस्पष्ट आहे. परंतु हा प्रकार त्याच्या परिवाराची एक जुनी परंपरा राहिली असेल असे मानले जाते. त्याच्या परिवाराच्या सदस्यांची नावे देखील अत्यंत मोठी राहिली असू शकतात.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यासाठी एक खास प्रक्रिया असते. या प्रक्रियेत नावाची लांबी मोजली जाते. ह्यूबर्टचे नाव या प्रक्रियेत यशस्वीपणे पास झाले आणि त्यांना जगातील सर्वात मोठे असलेल्या व्यक्तीचा मिळाला. नाव अत्यंत मोठे असल्याने ह्यूबर्ट यांच्या दैनंदिन जीवनावरही मोठा प्रभाव पडायचा. त्यांना स्वत:छो नाव वारंवार लिहिणे, वाचणे आणि सांगावे लागायचे. त्यांना वेळोवेळी स्वत:च्या नावावरून अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागत होत्या. परंतु त्यांना स्वत:च्या परिवारामुळे नावाबद्दल गर्व होता.
नावाचा हा विक्रम अद्याप कोणीच मोडू शकलेला नाही. परंतु एवढे मोठे नाव ठेवणे कुणासाठी शक्य देखील नाही. सद्यकाळात स्वत:चे नाव छोटे असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.