पाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यात 17 जवान ठार
खैबर पख्तुनख्वा प्रांतात 6 दहशतवाद्यांचाही खात्मा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुधवारी आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात 17 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच यात सहा दहशतवादीही ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. जवानांनी दहशतवाद्यांना बाहेरच रोखल्यानंतर एका दहशतवाद्याने चेकपोस्टच्या भिंतीला आपले वाहन धडकवल्यानंतर स्फोटकांचा स्फोट झाला. यापूर्वी गेल्या आठवड्यात एका रेल्वे स्थानकावर घडवण्यात आलेल्या हल्ल्यातही लष्करी जवानांना टार्गेट करण्यात आले होते.
पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन एका संयुक्त चेकपोस्टवर घुसवले. दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री उशिरा बन्नू जिल्ह्यातील मालीखेल भागात संयुक्त चेकपोस्टवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा दलांनी पोस्टमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न प्रभावीपणे हाणून पाडला, असे लष्कराच्या इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन्स, मीडिया विंगने सांगितले. आत्मघाती स्फोटामुळे भिंतीचा काही भाग कोसळला आणि आजूबाजूच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. त्यानंतर झालेल्या गोळीबारात सहा दहशतवादीही ठार झाल्याचे सांगण्यात आले. जखमींना स्थानिक ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशाच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वाने मंगळवारी बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटनांविऊद्ध मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाईला मंजुरी देण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांमध्येच हा हल्ला झाला.