महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कानावर सर्वात लांब केस असण्याचा विक्रम

07:00 AM Dec 02, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका वृद्ध व्यक्तीला वेगळाच ध्यास लागला आहे. त्याला कानांवरील केसांबद्दल प्रचंड प्रेम आहे. याच प्रेमामुळे त्याचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाले आहे. मागील 15 वर्षांपासून या व्यक्तीच्या नावावर हा अनोखा विक्रम आहे. विशेष म्हणजे हा विक्रम नोंदविणारा व्यक्ती आपल्याच देशातील आहे.  गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने स्वतःच्या इन्स्टाग्राम पेजवर एंटनी व्हिक्टर नावाच्या एका निवृत्त शिक्षकाची पोस्ट अपलोड केली आहे. व्हिक्टर यांच्या कानावरील केसांची लांबी सुमारे 7 इंच इतकी आहे. एंटनी यांच्या नावावर यासंबंधीचा विक्रम  2007 सालापासून आहे. एंटनी हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या कानावरील केसांची लांबी 18.1 सेंटीमीटर म्हणजेच 7.12 इंच इतकी आहे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी त्यांना ‘कानावरील केस असणारा शिक्षक’ म्हणायचे. सोशल मीडियावर या व्यक्तीचे कानावरील केस पाहून लोक चकित होत आहेत. अनेकांनी या पोस्टवर कॉमेंट केली आहे. कुणाला हवा आहे असा विक्रम, असे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱया युजरने माझ्या जीवनाचे लक्ष्य हा विक्रम मोडणे असल्याची मजेशीर कॉमेंट केली आहे. 2003 मध्ये राधाकांत वाजपेयी या व्यक्तीच्या नावावर यासंबंधीचा यापूर्वीचा विक्रम नोंद होता. त्यांच्या कानावरील केसांची लांबी 13.2 सेंटीमीटर इतकी होती. तसेच ते उत्तरप्रदेशात राहत होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article