महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रामजन्मभूमी निर्णय सर्वसहमतीनेच निनावी

06:11 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे महत्वपूर्ण प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी अयोध्येतील रामजन्मभूमीसंबंधी दिलेला निर्णय सर्वसहमतीनेच निनावी ठेवला आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी केले आहे. हा ऐतिहासिक निर्णय 9 नोव्हेंबर 2019 या दिवशी देण्यात आला होता. तो तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय पीठाने दिला होता. विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड हे त्या पीठाचे एक सदस्य होते.

सोमवारी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या निर्णयाचा उल्लेख केला. या निर्णयाचे लेखन कोणत्या न्यायाधीशांनी केले, हे गुप्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तो निनावी निर्णय आहे. तसे करण्याचा निर्णय त्या पीठातील सर्व न्यायाधीशांनी सर्वसहमतीने घेतला होता. निर्णय घोषित करण्यापूर्वी पीठाचे सर्व सदस्य एकत्र चर्चा करतात. तशीच चर्चा त्यावेळी करण्यात आली होती. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असेल. तो विशिष्ट न्यायाधीशांच्या नावाने नसेल, असे त्याचवेळी निर्धारित करण्यात आले होते. या प्रकरणाला प्रदीर्घ इतिहास होता. तसेच प्रदीर्घ वादाची पार्श्वभूमीही होती. त्यामुळेच निर्णय एकमुखाने घेण्यात आला. न्यायालय या विषयावर एकमुखी आहे, हा संदेश त्यातून गेला. तसेच तो संपूर्ण पीठाचा निर्णय म्हणूनच घोषित करण्यात आला. निर्णयाच्या अंतिम आदेशासंबंधीच केवळ नव्हे, तर जी कारणमीमांसा निर्णयात करण्यात आली आहे, त्यासंबंधीही सर्व न्यायाधीशांचे एकमत होते, असे त्यांनी त्यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. तसेच यापेक्षा अधिक बोलण्यास नकार दिला.

हिंदूंचा विश्वास राहिला अबाधित

अयोध्येतील ते विशिष्ट स्थानच रामजन्मभूमी आहे, हा हिंदूंचा विश्वास अनेक शकते अबाधित राहिला आहे. बाबरी मशिद बांधली जाण्याच्या पूर्वीपासून हिंदू याच विश्वासाने त्या स्थानी येत होते. बाबरी बांधली गेल्यानंतरही ते तेथे अव्याहतपणे येत राहिले. त्यामुळे त्यांचा या स्थानावर अधिकार निर्माण झाला आहे. परिणामी, हे स्थान राम मंदिरासाठी देणे न्यायोचित आहे, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, करसेवकांकडून बाबरी पाडली जाणे ही चूकच होती. ती हानी भरुन काढणेही आवश्यक होते. म्हणून रामजन्मभूमी स्थानापासून दूर पाच एकर जागा मशिदीच्या बांधकामासाठी देण्यात यावी, असाही आदेश देण्यात येत आहे, असाही आदेश या निर्णयात देण्यात आला होता.

प्राणप्रतिष्ठेनंतर साजरा करा आनंदोत्सव !

अयोध्येच्या रामजन्मभूमी स्थानी निर्माण होत असलेल्या भव्य राममंदिराच्या गर्भगृहात 22 जानेवारी 2024 या दिवशी दोन प्रहरी 12 वाजून 20 मिनिटे या मुहूर्तावर केला जाणार आहे, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे. ते सोमवारी पत्रकारांशी संवाद करत होते. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशांमधील मंदिरे आणि घरांमध्ये आरती केली जाऊ शकते. तसेच प्रसादाचे वितरण समाजात किंवा बाजारपेठांमध्ये केले जाऊ शकते. तसेच देशभरातील नागरीक आपल्या घरांमध्ये आणि सार्वजनिक स्थानी सूर्यास्तानंतर दीपप्रज्वलन करुन आनंदोत्सव साजरा करु शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असेच आवाहन नागरीकांना केले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. सोमवारी चंपत राय यांच्या सहभागाने न्यासाने ‘अक्षता’ वितरणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. त्याप्रसंगी त्यांनी 22 जानेवारीच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती सर्वांना दिली आहे.

ड रामजन्मभूमी विवादाचे गांभीर्य पाहता एकमुखी निर्णयाची होती आवश्यकता

ड सर्व न्यायाधीशांचे अंतिम आदेशासंबंधी, तसेच कारणमीमांसेविषयीही एकमत

ड सर्व न्यायाधीशांचा निर्णय एकत्रित चर्चा करुन, तसेच परिपूर्णत: विचारपूर्वक

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article