महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

5 दिवसांनी छाप्याची कारवाई संपुष्टात

06:22 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माजी आमदार दिलबाग सिंह यांना अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ यमुनानगर

Advertisement

हरियाणाच्या यमुनानगरचे आयएनएलडीचे माजी आमदार दिलबाग सिंह यांच्यावर घरावर पडलेल्या छाप्याची कारवाई 5 दिवसांनी संपुष्टात आली आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई संपुष्टात आली असून ईडीच्या टीमने माजी आमदार दिलबाग सिंह यांना अटक केली आहे.

दिलबाग सिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे आयफोन ईडीच्या पथकाकडून जप्त करण्यात आले आहेत. तसेच दिलबाग सिंह यांचे निकटवर्तीय कुलविंदर सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. ईडीने दिलबाग सिंह यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. ईडीच्या पथकाने दिलबाग सिंह यांना स्वत:सोबत कार्यालयात नेले आहे.

4 जानेवारी रोजी ईडीच्या टीमने दिलबाग सिंह यांच्या ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकले होते. कारवाईदरम्यान त्यांच्या घरातून विदेशी शस्त्रास्त्रs, मद्य आणि सोन्यासमवेत 5 कोटी रुपये हस्तगत करण्यात आले होते. 48 वर्षीय दिलबाग सिंह हे दोनवेळा आमदार राहिले आहेत. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत ते विजयी झाले हेते. परंतु 2019 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आयएनएलडी नेते अभय चौताला यांचे ते नातलग आहेत. दिलबाग सिंह यांच्या कन्येचा विवाह अभय चौताला यांचा पुत्र अभय चौतालासोबत झाला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article