जगातील सर्वात शांत खोली
हृदयाचे ठोके अन् हाडांचाही ऐकू येतो आवाज
जगातील सर्वात शांत खोली किंवा कक्ष मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये आहे. ही रुम इतकी शांत आहे की, यात गेल्यावर तुम्हाला तुमच्या रक्तप्रवाहाचाही आवाज ऐकू येतो. ही रुम अत्यंत उत्तमप्रकारे डिझाइन करण्यात आली असून यात बाहेरील कुठल्याही गोष्टीचा आवाज ऐकू येत नाही. या रुममध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला हृदयाचे ठोकेही ऐकू येतात. तसेच हाडांचाही आवाज ऐकू येतो. ही रुम अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात आहे. या रुममध्ये अनेक खास गोष्टींना सामील करण्यात आले आहे. यामुळे बाहेरील गोंगाट आत प्रवेश करत नाही. याचबरोबर आतील आवाज दूर करण्यासाठी अनेक खास उपकरणे बसविण्यात आली आहेत. याला एनेकोइक रुम देखील म्हटले जाते. या रुमच्या डिझाइनिंगला अत्यंत अनोख्या शैलीत करण्यात आले. याला काँक्रिट आणि स्टीलच्या आवरणाने तयार करण्यात आले आहे. या रुमच्या निर्मितीकरता सुमारे दीड वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला आहे. याचमुळे या रुमचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात शांत रुमच्या स्वरुपात सामील आहे.