For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिक्त वायरमन पदाचा प्रश्न लवकरच सुटेल

11:28 AM Dec 29, 2023 IST | अनुजा कुडतरकर
रिक्त वायरमन पदाचा प्रश्न लवकरच सुटेल
Advertisement

सावंतवाडी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री तनपुरे यांची वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाही

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील वीज तारांवरील झाडी तोडण्यासह गंजलेले वीज खांब बदलण्याबाबत आणि इतर विज समस्या मार्गी लावण्यासाठी त्वरीत कार्यवाही केली जाईल. तसेच आयटीआय पूर्ण केलेल्यास तात्काळ नियुक्ती देऊन रिक्त वायरमनचा प्रश्नसोडविण्यात येईल अशी ग्वाही महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री तनपुरे यांनी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेने तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याबाबत विज उपकेंद्रांतर्गत विभागीय बैठका घेत ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी संघटनेने महावितरणच्या जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गुरूवारी सावंतवाडीत झालेल्या बैठकीला उपकार्यकारी अभियंता श्री. मिसाळ, सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण, कनिष्ठ अभियंता सुहास परब, वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष आनंद नेवगी, तालुका समन्वयक गणेश तथा बाळ बोर्डेकर, कार्यकारणी सदस्य पुंडलिक दळवी, कृष्णा गवस, अनिकेत म्हाडगुत, संतोष तावडे, समीर माधव, सावरवाड सरपंच सौ. देवयानी पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ. रेषा तेली, आनंद राऊळ (कारीवडे), रामचंद्र राऊळ (तळवडे) आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांना लागून ट्रीप होऊन खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित करताच कार्यकारी अभियंता श्री तनपुरे यांनी ३ जानेवारी रोजी सांगेली, ४ जानेवारी सावरवाड, वेर्ले, ५ जाने. शिरशिंगे, ६ जानेवारी माडखोल, ९ व १० जाने. आंबोली, चौकूळ, गेळे या गावांमध्ये झाडी कटिंग करण्यासाठी गाडी पाठवण्याचे आश्वासन दिले. तसेच दाणोली, कारिवडे, केसरी, पारपोली, सातुळी बावळट गावांमधील झाडी तोडण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुक्यातील रिक्त वायरमनचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर श्री तनपुरे यांनी आयटीआय पूर्ण केलेल्यास तात्काळ नियुक्ती देऊन रिक्त वायरमन पदे भरण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच आंबोली, चौकूळ, कलंबीस्त आदी गावांतील जीर्ण झालेले विद्युत खांब लवकरच बदलण्याची ग्वाही दिली. यावेळी ओटवणे, दाभिळ येथील प्रलंबित वीज समस्या सकारात्मक चर्चेतून निर्णय घेण्यात आला. यावेळी वीज ग्राहक संघटना आणि महावितरण अधिकारी यांनी समन्वय साधून सावंतवाडी तालुक्यातील वीज समस्या मार्गी लावण्याचे ठरविण्यात आले. यावेळी श्री तनपुरे यांनी गावांतील सरपंच, उपसरपंच आणि संघटना सदस्यांनी वीज समस्या बाबत वेळीच माहिती देण्याचे आवाहन केले.

Advertisement
Tags :

.