For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द.आफ्रिकी माऱ्यासमोर आज इंग्लिश फलंदाजीचा कस

06:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
द आफ्रिकी माऱ्यासमोर आज इंग्लिश फलंदाजीचा कस
Advertisement

वृत्तसंस्था /ग्रोस आइलेट (सेंट लुसिया)

Advertisement

वेस्ट इंडिजविऊद्धचा विजय हा इंग्लंडच्या फलंदाजांना योग्य वेळी सूर सापडल्याचा संकेत असला, तरी आज शुक्रवारी येथे होणार असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर एट स्तरावरील गट-2 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर त्यांचा कस लागणार आहे. इंग्लंडने विंडीजविऊद्ध सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या 0.90 च्या तुलनेत 1.34 या चांगल्या धावसरासरीच्या जोरावर त्यांना गटात अव्वल स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या सुपर एटच्या सलामीच्या लढतीत 18 धावांनी विजय मिळवण्याआधी अमेरिकेकडून तडाखा स्वीकारावा लागला. विंडीजविरुद्ध इंग्लिश सलामीवीर फिल सॉल्टने नाबाद 87 धावा करत आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे टी-20 फलंदाज का आहोत हे दाखवून दिले आहे.

सॉल्ट पुन्हा एकदा त्याचा कर्णधार जोस बटलरसह इंग्लंडला स्फोटक सुऊवात करून देण्याचा प्रयत्न करेल. बटलरही मोठी खेळी करण्याचे लक्ष्य ठेवून असेल. वेस्ट इंडिजविऊद्ध नाबाद 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केलेल्या जॉनी बेअरस्टोचे फॉर्ममध्ये पुनरागमन इंग्लंडसाठी मोठे बळ देणारे ठरेल. या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांच्यासमोर असेल. दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वांत मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे क्विंटन डी कॉकने त्याचा फॉर्म पुन्हा मिळविणे. दुसरीकडे गोलंदाजीचा विचार करता इंग्लंडचा आदिल रशिद व जोफ्रा आर्चर यांनी विंडीजविरुद्ध प्रभावी गोलंदाजी केली.

Advertisement

संघ-इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, फिल सॉल्ट, रीस टोपली आणि मार्क वूड. दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, बी. फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एन्रिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी व ट्रिस्टन स्टब्स.

सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement
Tags :

.