Satara : सासपडे गावात 20 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू
गावांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय
सातारा : मौजे सासपडे तालुका सातारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक आयोजित करून दिलेल्या निर्देशानुसार सासपडे येथे जिल्हा परिषद मार्फत दिलेल्या सूचनेनुसार ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोग निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना केली होती. त्यास अनुसरून सदर सूचनेनुसार गावामध्ये 20 सीसी टीव्ही कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
जेणेकरून गावातील कायदा व सुव्यवस्था व सुरक्षितता या अनुषंगाने सदर सीसीटीव्ही चा उपयोग होऊ शकतो.मा. पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनेस जिल्हा परिषदेने तात्काळ प्रतिसाद देऊन सदर सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया तात्काळ कार्यान्वित केली.
मौजे सासपडे ता. जि.सातारा या गावाप्रमाणेच प्रत्येक गावातील कायदा सुव्यवस्था व सुरक्षितच्या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 15 व्या वित्त आयोग निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे धोरण लवकरात लवकर अमलात येईल असे याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी,सातारा जिल्हा परिषद सातारा यांनी सांगितले.