महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मोकाट जनावरांचा प्रश्न कायम

10:29 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न कायम असून यावर मनपाकडून कारवाई करण्यात आली असली तरी कोणताच फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने निर्माण करण्यात आलेल्या पदपथांवर मोकाट जनावरे ठाण मांडून आहेत तर बसथांब्यांमध्ये जनावरे बसून असल्याने प्रवाशांना थांब्याबाहेर उभे राहावे लागत आहे. मोकाट जनावरांमुळे शहरात अनेक समस्या निर्माण होत आहेत. रस्त्यांवर ठाण मांडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तर रस्त्यांवर व पदपथांवर सदर जनावरे बसत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने मोकाट जनावरे ठिकठिकाणी असणाऱ्या बसथांब्यांमध्ये बसून आहेत. यामुळे शहरातील बस थांब्यांवरील प्रवाशांना थांब्याबाहेर उभे राहावे लागत आहे. ही समस्या अनेक दिवसांपासून कायम असून कायमस्वरुपी तोडगा निघणार का? असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article