महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खलिस्तान समर्थक पक्षाने सोडली ट्रडोंची साथ

07:00 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅनडात अडीच वर्षांपासून होती आघाडी : निवडणुकीच्या एक वर्ष अगोदरच कोसळणार सरकार 

Advertisement

वृत्तसंस्था/ओटावा

Advertisement

कॅनडात जस्टिन ट्रुडो यांच्या लिबरल पार्टी आणि न्यू डेमोक्रेटिक पार्टी (एनडीपी) यांच्यातील आघाडी संपुष्टात आली आहे. यामुळे अल्पमतात आलेले ट्रुडो सरकार आता संकटात सापडले आहे. ट्रुडो यांना आता सत्ता टिकविण्यासाठी अन्य पक्षांचे समर्थन प्राप्त करावे लागणार आहे. एनडीपीचे खलिस्तान समर्थक नेते जगमीत सिंह यांनी एक व्हिडिओ जारी करत दोन्ही पक्षांमध्ये 2022 साली झालेला करार संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली आहे. तसेच लिबरल पार्टी व्यापाऱ्यांसमोर झुकले असून सुधारणा घडवून आणू शकत नसल्याची टीका केली आहे. एनडीपीने 2022 मध्ये ट्रुडो सरकारला समर्थन देण्याची घोषणा केली होती. एनडीपी आणि लिबर पार्टी यांच्यात झालेल्या कराराला ‘सप्लाय अँड कॉन्फिडेन्स’ संबोधिले जात होते. कराराच्या अंतर्गत एनडीपी विधेयक संमत करण्यासाठी लिबरल पार्टीला पाठिंबा देत होती. याच्या बदल्यात ट्रुडो सरकार एनडीपीशी निगडित धोरणे लागू करत होते.

संसदेत अल्पमतात

पंतप्रधान ट्रुडो यांनी जनतेला निराश केले आहे. आणखी एक संधी मिळविण्याच्या योग्यतेचे ते राहिलेले नाहीत. त्यांच्यासोबत झालेला करार मी कचऱ्याच्या पेटीत फेकणार असल्याचे जगमीत यांनी म्हटले आहे. संसदेत ट्रुडो यांच्या पक्षाचे 130 खासदार आहेत. सत्ता टिकविण्यासाठी त्यांच्या पक्षाला आणखी 9 जणांचे समर्थन लागणार आहे. आतापर्यंत 24 जागा जिंकणारा एनडीपी ट्रुडो सरकारला पाठिंबा देत होती. बहुमतासाठी ट्रुडो यांच्या पक्षाला आता क्यूबेक पार्टीचा (32 जागा) पाठिंबा मिळवावा लागणार आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या कॉन्झरवेटिव्ह पार्टीचे 119 खासदार आहेत. सर्वेक्षणानुसार आता निवडणूक झाली तर कॉन्झरवेटिव्ह पार्टीला बहुमत मिळू शकते. याचमुळे ट्रुडो सरकारला निवडणूक टाळणे भाग पाडणार आहे.

चालू महिन्यात संसदेचे अधिवेशन

ट्रुडो सरकारवर अद्याप बहुमत सिद्ध करणे किंवा नव्याने निवडणूक करविण्याचा धोका नाही, परंतु सरकार कोसळण्याची जोखीम कायम आहे. लिबरल पार्टीला अर्थसंकल्प संमत करणे आणि निवडणूक टाळण्यासाठी हाउस ऑफ कॉमन्समध्ये  अन्य विरोधी पक्षांचे समर्थन मिळवावे लागणार आहे. चालू महिन्याच्या अखेरीस संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. एखाद्या पक्षाने सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला तर ट्रुडो सरकारला बहुमत सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. यात अपयश आले तर ऑक्टोबर 2025 पूर्वी देशात निवडणूक होऊ शकते. जगमीत सिंह यांनी चालू महिन्याच्या अखेरीस अविश्वास प्रस्ताव मांडणार असल्याचे सांगत आमचा पक्ष आगामी निवडणुकीसाठी तयार असल्याचा दावा केला आहे.

जगमीत सिंह यांची भारतविरोधी प्रतिमा

जगमीत सिंह 2017 पासून एनडीपीचे प्रमुख आहेत. त्यांचे आईवडिल पंजाबमधून कॅनडात स्थलांतरित झाले होते. जगमीत सिंह यांना 2013 मध्ये भारताने व्हिसा देण्यास नकार दिला होता. त्यांच्यावर भारतविरोधी कृत्यांमध्ये सामील असणे आणि कट्टरवाद्यांसोबत संबंध बाळगल्याचा आरोप आहे. 1984 च्या शिखविरोधी दंगलीप्रकरणी आवाज उठविल्यानेच भारत सरकार माझ्यावर नाराज असल्याचा दावा जगमीत यांनी केला होता. जगमीत यांनी जून 2015 मध्ये खलिस्तान समर्थनार्थ सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयोजित रॅलीत भाग घेतला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article