For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj : मिरज खुनातील मुख्य संशयित कारागृहातून पळाला

01:18 PM Nov 14, 2025 IST | NEETA POTDAR
miraj   मिरज खुनातील मुख्य संशयित कारागृहातून पळाला
Advertisement

                     सांगली कारागृहातून खुनाती ल मुख्य संशयिताचा पलायन

Advertisement

सांगली : मिरजेत आठ महिन्यापूर्वी झालेल्या कुणाल बाली याच्या खुनातील मुख्य संशयित अजय डेव्हिड भोसले (रा. मिरज) हा गुरुवारी सांगली कारागृहातून पळाला. त्यामुळे कारागृह प्रशासनाचे तारांबळ उडाली.

भोसलेच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. कुणालचा भाऊ वंश वाली याला मिरजेत निखिल कलगुटगी याच्या खुनातील संशयित सलीम पठाण याच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न करताना बुधवारी पोलिसांनी पकडले आहे. त्यानंतर गुरुवारी वंशचा भाऊ कुणाल वाली याच्या खुनातील संशयित अजय भोसले हा कारागृहातून पसार झाल्याचा प्रकार घडला आहे.

Advertisement

सध्या कारागृहात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही काम सुरू आहे. गुरुवारी सकाळी अजय भोसले यांनी पळून जाण्याची संधी मिळताच कारागरातून बाहेर धूम ठोकली. तो पळाल्याचे समजतात तत्काळ कारागृह प्रशासन सतर्क झाले. भोसले हा बस स्थानकाच्या दिशेने पळून गेल्याचे समजतात कारागृह पोलीस त्याच्या मागावर धावले.

सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते देखील अजय भोसलेचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होते. काही दिवसांपूर्वी एका कायद्याने धूम ठोकल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर पुन्हा एकदा कारागरातून कैदी पळाल्याने सुरक्षेचा प्रश्र ऐरणीवर आला आहे.

 

Advertisement
Tags :

.