महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधानांच्या ताफ्याने अॅम्ब्युलन्सला दिला रस्ता

06:48 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसीमध्ये आपल्या रोड शोदरम्यान रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देताना आपला वाहनताफा थांबवला. पंतप्रधानांचा ताफा वाराणसीच्या एका रस्त्यावरून जात असताना त्या रस्त्यावर एक रुग्णवाहिका येताना पाहून पीएम मोदींनी आपला ताफा काही वेळ थांबवला. यादरम्यानचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले. यादरम्यान त्यांनी काशी आणि आसपासच्या भागाच्या विकासासाठी 19,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 37 प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी पीएम आवास, पीएम स्वानिधी, पीएम उज्ज्वला अशा विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान रविवारी दुपारी वाराणसीला पोहोचले. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी काशीमध्ये जवळपास 25 तास घालवणार आहेत.

वाराणसी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी संध्याकाळी नमो घाट येथून ‘काशी तमिळ संगम’च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. तसेच कन्याकुमारी ते बनारस येथून काशी तमिळ संगम एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. 17 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या टप्प्यात तामिळनाडू आणि पाँडिचेरी येथील 1,400 मान्यवर वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्येला भेट देतील. यादरम्यान तामिळनाडू आणि काशी येथील कला, संगीत, हातमाग, हस्तकला, पाककृती आणि इतर विशेष उत्पादनांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय काशी आणि तामिळनाडूच्या संस्कृतींवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article