For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वकीयांच्या मृत्यूनंतर शरीराला ईजा पोहोचविण्याची प्रथा

06:07 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वकीयांच्या मृत्यूनंतर शरीराला ईजा पोहोचविण्याची प्रथा
Advertisement

इंडोनेशियाच्या दानी समुदायामधील अजब प्रकार

Advertisement

जगातील अनेक देश आणि संस्कृतींमध्ये अद्याप शतकांपेक्षा जुन्या परंपरा कायम आहेत. या परंपरा कधी थक्क करणाऱ्या तर कधी भयभीत करणाऱ्या असतात. आम्हाला या प्रथा-परंपरा विचित्र वाटत असल्या तरीही आदिवासींसाठी त्या अत्यंत खास आहेत. अशीच एक प्रथा इंडोनेशियाच्या दानी नावाच्या समुदायामध्ये प्रचलित आहे. या समुदायाच्या महिला स्वकीयांच्या मृत्यूनंतर जणू स्वत:लाच शिक्षा करून घेतात.

दानी समुदायात परिवारातील महिला एखाद्या आप्ताच्या मृत्यूनंतर त्याच्या सन्मानार्थ आणि शोकाचा संकेत म्हणून स्वत:च्या बोटांच्या वरील हिस्स्याला कापून टाकतात. हा प्रकार ते कुठलीही हयगय न करता करत असतात.

Advertisement

या प्रथेचा उद्देश स्वकीयाला गमाविल्यानंतर जाणवणाऱ्या वेदनेचे प्रतीक म्हणून असतो. अशाचप्रकारे या समुदायाचे लोक अनेकदा स्वत:च्या आयुष्यात स्वत:च्या अनेक बोटांना कापतात, सिंगापूरचे छायाचित्रकार आणि आयटी सपोर्ट इंजिनियर तेह हान लिन यांनी चार दिवसांच्या कालावधीत या समुदायाची अनेक छायाचित्रे टिपली होती.

पारंपरिक कोटेका

दानी समुदाय अत्यंत अनोखा आहे. विशेष करून त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांच्या पारंपरिक कोटेका (पुरुषांकडून परिधान केले जाणारे अनोखे वस्त्र) परिधान करण्याचा प्रकार अनोखा आहे. हा समुदाय कधी विलुप्त होईल हे मी जाणत नाही, याचमुळे मी त्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता असे त्यांनी सागितले.

1938 मध्ये लागला होता शोध

दानी लोकांच्या स्वरुपात ओळखल्या जाणाऱ्या या समुदायाचा शोध 1938 मध्ये एका अभियानानंतर अमेरिकन व्यक्ती रिचर्ड आर्चबोल्ड यांनी लावला होता. 20 व्या शतकाच्या मध्यापासून दानी समुदाय स्वत:च्या अनोख्या प्रथा आणि ओळखीच्या मजबूत भावनेसाठी प्रसिद्ध झाली आहे. केवळ महिलांनाच स्वत:ची बोटं कापावी लागतात. ही एक क्रूर आणि अमानवीय प्रथा आहे, परंतु त्यांच्यासाठी स्वकीयांबद्दलचे दु:ख व्यक्त करण्याची एकमात्र पद्धत आहे आणि ती पार पाडताना ते मागेपुढे पाहत नसल्याचे तेह हान यांनी सांगितले.

इंडोनेशिया सरकारकडून बंदी

परंतु आता या प्रथेला इंडोनेशियाच्या सरकारने बेकायदेशीर घोषित केले आहे, परंतु ही प्रथा पूर्णपणे संपलेली नाही. याचबरोबर या परंपरेचे संकेत म्हणून समुदायाच्या वृद्ध महिलांना अद्याप पाहिले जाऊ शकते. स्वत:च्या वादग्रस्त प्रथा-परंपरांनंतरही दानी समुदाय दशकांपासून या क्षेत्रात पर्यटकांना आकर्षित करत आहे. कारण अधिकाधिक लोक याच क्षेत्रात येतात. लोक त्यांची काहीशी अनोखी आणि सरळ जीवनशैली पाहण्यासाठी उत्सुक असतात.

हेडहंटर्स अशीही ओळख

क्षेत्रातील अन्य समुदायांमध्ये दानी समुदायाची प्रतिमा काहीशी भीतीदायक आहे. दानी लोकांना सर्वात नृशंस हेडहंटर्स म्हणून ओळखले जाते. परंतु ते स्वत:ला भेटायला येणाऱ्या लोकांचे उत्साहाने स्वागत करतात. दानी समुदाय बहासा इंडोनेशिया किंवा इंग्रजी भाषा बोलत नाहीत. तर शारीरिक भाषा आणि हातवाऱ्यांद्वारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात.

Advertisement
Tags :

.