For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वकीयांचे अवशेष जोपासण्याची प्रथा

06:09 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वकीयांचे अवशेष जोपासण्याची प्रथा
Advertisement

जगभरात स्वकीयांना गमाविण्याच्या दु:खात लोक अस्वस्थ होत असतात. काही लोक स्वकीयांच्या आठवणी जोपासून ठेवतात तर काही ठिकाणी परंपराच अशा आहेत की स्वकीयांच्या मृत्यूनंतरही त्यांचे अवशेष जोपासून ठेवता येतात. अशीच एक परंपरा आहे मृत शरीराला मोतीमध्ये बदलण्याची, प्रत्यक्षात ही परंपरा दक्षिण कोरियात पार पाडली जाते. तेथे स्वकीयांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाला मोत्यांमध्ये बदलून अवशेष जोपासले जातात.

Advertisement

जगभरात विविध धर्मांचे लोक राहतात आणि ते वेगवेगळ्या परंपरांचे पालन करतात. एकाठिकाणी मृत्यूनंतर अशी प्रकारची परंपरा पार पाडली जाते, ज्याबद्दल कळल्यावर चकित व्हायला होते. दक्षिण कोरियात अंत्यसंस्काराच्या काही परंपरा सर्वात हटके आहेत. तेथे कुणाचा मृत्यू झाल्यावर त्याचे कुटुंबीय अग्निसंस्कार केल्यावर त्याच्या राखेला वेगवेगळ्या रंगांच्या मोत्यांमध्ये संरक्षित करून ठेवतात. यानंतर या मोत्यांना काचेच्या भांड्यात ठेवून घरातील खास ठिकाणी ठेवले जाते. मृत्यूनंतरही प्रियजन आपल्या आसपासच आहेत असे या परंपरेमुळे दक्षिण कोरियाच्या लोकांना वाटत असते.

कंपन्या करतात काम

Advertisement

दक्षिण कोरियातील एक डेथ बीड कंपनी बोनहयांग देखील मृतदेहाची राख मोत्यांमध्ये संरक्षित करण्याचे काम करत आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ बा जे यूल यांच्यानुसार कंपनीने मागील एक दशकात 1 हजाराहून अधिक ग्राहकांना स्वत:ची सेवा दिली आहे. अशाप्रकारच्या आणखी काही कंपन्या दक्षिण कोरियात मृतदेहांच्या राखेला मोत्यांमध्ये बदलण्याचे काम करतात. या मोत्यांचे हार तयार केले जात नाही. तर त्यांना केवळ घरातील एखाद्या कोपऱ्यात संरक्षित करून ठेवले जाते.

Advertisement
Tags :

.