कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिरजोळी रस्त्याचे खड्डे भरले नदीतील गाळाने

11:58 AM Jul 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

चिपळूण :

Advertisement

गुहागर मार्गावर मिरजोळी साखरवाडी येथे पडलेले मोठमोठे खड़े गुरुवारी थातूर मातुर पद्धतीने भरण्याचा प्रताप ठेकेदाराने केला आहे. दिव्यांगांनी आंदोलनाच्या दिलेल्या इशाराऱ्यानंतर ठेकेदारासह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. मात्र हे खड्डे नदीतील गाळ व अन्य साहित्याने भरल्याने आता चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून मिरजोळी साखरवाडी येथे दरवर्षी मोठ्याप्रमाणात खड्डे पडत आहेत. मात्र तरीही येथे कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यांनी डोके वर काढल्याने दिव्यांगांसह युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र ते पहिल्याच पावसात उखडले. यामुळे त्याचा दर्जा स्पष्ट होऊन गेल्या महिनाभरापासून येवूनखहुचातूनच प्रयास करावा लागत होता यामुळे दिव्यांग संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संतोष होळकर यांनी दोन दिवसांपूर्वी खड्ढे भरा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे गुरुवारी संबधित ठेकेदाराने नदीतील गाळ व अन्य साहित्याने हे खड्ढे भरले. मात्र यामुळे चिखल पसरला असून त्यावर योग्य पद्धतीने रोलर न फिरवल्याने काही भागात उचाटे राहिले आहेत. त्यामुळे त्यावरून कोणीही वाहने न चालवता विरुद्ध मागनि जात आहेत. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अदांज न आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवारी दिवसभर पाऊस नसल्याने येथे तितकासा त्रास जाणवत नव्हता. मात्र शुक्रवारी पाऊस पडत्त्यावर येथे चिखलाचे साम्राज्य पसरले अतून त्यावरून वाहने घसरण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हे खड्डे भरताना याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. येथे एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे ठेकेदाराचे कामगार मनमानी करताना दिसत होते. यामुळे ग्रामस्थांनी सांगिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत निकृष्ट पद्धतीने खड्डे भरण्यात आले.

या खड्यांचा ग्रामस्वासह वाहनचालकाना त्रास होत असून आमच्यासारख्या दिव्यांगांना अधिकच त्रास होत आहे. त्यामुळे थातूरमातूर पद्धतीने खड़े भरून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र चांगल्या पद्धतीने खड्डे भरले गेले नाही तर आंदोलन केले जाईल. - संतोष होळकर, जिल्हा सरचिटणीस, दिव्यांग संघटना

निसरड्या रस्त्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती

राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचा हलगर्जीपणा

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article