For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खड्ड्यांमुळे गोगटे ओव्हरब्रिज बनला धोकादायक

11:09 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
खड्ड्यांमुळे गोगटे ओव्हरब्रिज बनला धोकादायक
Advertisement

खड्डे अन् अंधारामुळे अपघातांना निमंत्रण : वेळीच दुरुस्तीची मागणी

Advertisement

बेळगाव : कपिलेश्वर व तिसरे रेल्वेगेटनंतर आता गोगटे ओव्हरब्रिजवरही खड्ड्यांची मालिका सुरू झाली आहे. उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहने चालविणेही अवघड झाले आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वी खड्ड्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील रेल्वे उड्डाणपुलांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट येथे तर सर्व थरातून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्यात आली. कपिलेश्वर उड्डाणपुलावर तर खडीचे ढीग साचले असल्याने वरचेवर अपघात होत आहेत. आता अशीच परिस्थिती गोगटे रेल्वे ओव्हरब्रिजवर देखील झाली आहे. गोवावेसकडून उड्डाणपुलाकडे येणाऱ्या मार्गावर अनेक खड्डे पडले आहेत.

उड्डाणपुलावर अंधार

Advertisement

गोगटे उड्डाणपुलावरील पथदीप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत. अनेकवेळा मागणी करूनदेखील अद्याप पथदीप सुरू करण्यात आलेले नाहीत. रेल्वे, कॅन्टोन्मेंट विभागातील समन्वयाच्या अभावामुळे या समस्या निर्माण होत आहेत. त्यातच आता सततच्या पावसामुळे उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गोवावेसकडून भरधाव येणारी वाहने या खड्ड्यांमध्ये अडकली जात आहेत. रात्रीच्या वेळी खड्डे निदर्शनास न आल्याने अपघात होत असल्याने एखाद्या निष्पापाचा बळी जाण्यापूर्वी पथदीप सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.