For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगाव मळेकरणी देवीच्या आमराईतील रस्त्याची दुर्दशा

10:06 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगाव मळेकरणी देवीच्या आमराईतील रस्त्याची दुर्दशा
Advertisement

पावसाळ्यापूर्वी रस्ता डांबरीकरणाची मागणी

Advertisement

वार्ताहर /उचगाव

उचगावच्या पश्चिमेला विखुरलेल्या शेतवडीमध्ये मळेकरणी देवीच्या आमराईतून पुढे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात  चिखल अशी अवस्था असून, सदर रस्त्याची ऊंदी अवघी सात फूट असल्याने एखादे दुहेरी वाहन जाऊ शकत नाही. यासाठी या शेतवडीमध्ये जाणाऱ्या रस्त्याची ऊंदी आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण अथवा डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. उचगावातील शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात शेती गावाच्या पश्चिम दिशेला मळेकरणी देवीच्या आमराईच्या मागील बाजूला असून या शेतवडीत शेतकऱ्यांना वर्षभर ये-जा करावी लागते. सदर रस्त्याची ऊंदी अतिशय कमी असल्याने विऊद्ध दिशेने ये-जा करणारी दोन मोठी वाहने पास होऊ शकत नाहीत. यामुळे फार मोठी अडचण अनेकवेळा होत असते. या मार्गावरून शेतवडीत जाणारे ट्रॅक्टर, टेम्पो यांची सतत रहदारी असते. याबरोबरच दुचाकी वाहनावरून गवताचे भारे तसेच इतर शेतीची अवजारे, साहित्यांची वाहतूक करावी लागते. सदर रस्ता मातीचा असल्याने तसेच रस्त्याचे खडीकरणही न झाल्याने उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य तर पावसाळ्यात चिखलाने माखलेल्या रस्त्यामुळे शेतवडीकडे कसे जायचे, हा मोठा प्रŽ शेतकऱ्यांसमोर उभा असतो.  रस्त्याची दुर्दशा झाल्याने पावसाळी हंगामात या रस्त्यावरून चालणेही मुश्किल होते. यासाठी एपीएमसी अथवा शासनाने या रस्त्याची तातडीने पावसाळ्यापूर्वी दुऊस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.