बेळगाव-बागलकोट महामार्गाची दुर्दशा
संबंधित खात्याने तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी
वार्ताहर/सांबरा
बाळेकुंद्री खुर्द ते पंत बाळेकुंद्री दरम्यानच्या बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाची अक्षरश: चाळण झाली असून, वाहन चालकांची गैरसोय होत आहे. तरी संबंधित खात्याने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचलकातून होत आहे. बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला असून, तेथून वाहने चालवताना वाहन चालकांची कसरत होत आहे. मुतगे, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, मोदगा आदी ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मात्र रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचलकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या दुरवस्थेचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा लहान-मोठे अपघात ही घडत आहेत. यासाठी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.