For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भिलारचे पठार फुलांनी बहरले

01:19 PM Aug 11, 2025 IST | Radhika Patil
भिलारचे पठार फुलांनी बहरले
Advertisement

भिलार :

Advertisement

भिलार पुस्तकाच्या गाव (ता. महाबळेश्वर) महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून असलेल्या महाबळेश्वर पाचगणी जवळच असणाऱ्या निसर्गरम्य पुस्तकाचे गाव असणाऱ्या पठाराव सुमारे ४०० एकरच्या विस्तारित पठारावर रंगबिरंगी फुलांनी बहरलेले आहे.

सध्या या पठारावर चाहूर, निळलवंती, मिकी माऊस, गेंद, उदिचिराईत, तेरडा, सोनकी, अशा सप्तरंगी फुलांची मुक्त उधळण झाल्याची दिसून येत आहे. फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी याठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होत आहे. या फुलांचे वैभव पाहण्यासाठी याठिकाणी पर्यटक भेटी देत असून येथे विविध प्रकारचे पक्षी, फळे, प्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचे जीव येथे आढळून येतात.

Advertisement

निसर्गरम्य अद्भुत ठेवा असलेल्या निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटक याठिकाणाला भेटी देत आहेत. सध्या स्थितीत पाचगणी परिसरातील डोंगर पठारावरची विविध रानफुले भरू लागले. पठाराच्या पूर्व दिशेस स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्य सैनिकांचे काही काळ वास्तव असलेले गुहा टायगर केव असे नैसर्गिक गुफा या ठिकाणी पाहण्यास मिळतात. या पठाराची पाहणी करताना वनक्षेत्रपाल एच. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुरेघर वन परीमंडळ अधिकारी आर.व्ही. काकडे, वनरक्षक बी. एस. जावीर, वनशिपाई संजय भिलारे, साहेबराव पारठे, सरपंच शिवाजी भिलारे, नितीन भिलारे, प्रवीण भिलारे, शिवाजी भिलारे, सचिन भिलारे ग्राविकास अधिकारी राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

  • निसर्ग सौंदर्याचा खजिना

याठिकाणी अनेक जातींच्या विविध रंगांची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक याठिकाणी भेटी देऊन मनसोक्त आनंद घेत आहेत. पर्यटकांना विविध फुलांचा आनंद घेण्यासाठी ग्रामपंचायती भिलार यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.

                                                                                                       - नितीनदादा भिलारे, सामाजिक कार्यकर्ते

Advertisement
Tags :

.