महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभेचे चित्र आज होणार स्पष्ट; अर्ज मागे घेण्याचा दिवस

10:46 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : गोव्यातील लोकसभा निवडणुकीचे अंतिम चित्र आज सोमवार दि. 22 एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे. आज अर्ज मागे घेण्याचा दिवस असून उत्तर गोवा व दक्षिण गोवा मिळून 22 उमेदवारांचे मिळून एकूण 33 अर्ज आले आहेत. काही पक्षांनी 2 ते 3 अर्ज दाखल केल्यामुळे अर्जांची संख्या वाढली आहे. एका पक्षाचा एकच अर्ज ठेवण्यात येतो बाकीचे अर्ज मागे घ्यावे लागतात. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील राजकीय स्थिती समोर येणार आहे. उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक तर काँग्रेसचे रमाकांत खलप हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून आरजीपीचे मनोप परब हे देखील निवडणूक लढवत आहेत. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे पल्लवी धेंपे या महिला उमेदवार असून काँग्रेसच्यावतीने विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय आरजीपीचे ऊबर्ट परेरा हे देखील रिंगणात आहेत. शिवाय काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यातील काहीजण अर्ज मागे घेतील असा अंदाज आहे. गोव्यातील लोकसभा निवडणुकीला केवळ 15 दिवसांचा कालावधी बाकी राहिला असून भाजप-काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांचा जोरदार प्रचार चालू आहे. आरजीपीसुद्धा प्रचारात उतरली असून खरी लढत या तिन्ही पक्षात होणार, असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे तिरंगी लढत रंगणार अशी लक्षणे आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article