महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राधानगरीकरांनी आपला शब्द पाळला !

05:08 PM Nov 26, 2024 IST | Radhika Patil
The people of Radhanagar kept their word!
Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द पाळणार का ?

Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

राधानगरीकरांनो..., आमदार प्रकाश आबीटकर यांना गेल्या वेळेच्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मताधिक्य द्या, त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीर उभा असून त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी..’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारगोटी येथील जाहीर सभेत केली होती. आता राधानगरी मतदारसंघातील जनतेने आपला शब्द पाळला आहे. आता मुख्यमंत्री शिंदे आपला शब्द खरा करणार का, याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राधानगरी विधानसभा मतदारसंघ मंत्रीपदाच्या लाल दिव्यापासून वंचित राहिला आहे. या मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रिक केलेले आमदार प्रकाश आबीटकर यांना मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी भावना लोकांमध्ये आहे.

राधानगरी-भुदरगड मतदारसंघ डोंगराळ व दुर्गम असून जिह्यात केवळ राधानगरी मतदारसंघ मंत्रिपदापासून वंचित राहिलेला आहे. 2019 मध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले प्रकाश आबीटकर निवडून आले होते. त्यांना मंत्रीपद मिळणे क्रमप्राप्त असतानाही त्यांना मंत्रीपदांनी हुलकावणी दिली आणि मंत्रीपदापासून मतदार संघ वंचितच राहिला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले आमदार प्रकाश आबिटकर मताधिक्याने हॅट्ट्रीक साधत विजयी झाले आहेत. आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. आमदार प्रकाश आबीटकर यांना मंत्रिपद देऊन राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघाचा सन्मान करावा, अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे.

राधानगरी मतदारसंघातील निवडणूक मोठी ऐतिहासिक झाली. बहुतांशी मातब्बर नेते एकीकडे असतानाही निव्वळ लोकसंपर्क व विकासकामांच्या जोरावर आमदार आबीटकर यांनी मताधिक्याने विजय खेचून आणला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खडतर काळात आमदार आबीटकर त्यांच्यामागे ताकतीने उभे राहिले. विशेष म्हणजे कोणत्याही पदांची त्यांनी अपेक्षा केली नाही. ज्या ज्या मागण्या केल्या त्या मतदार संघाच्या विकासाकरिता केल्या. त्यातुन मग संपुर्ण मतदारसंघात न भुतो न भविष्यतो असा विकास झाला. अडीच वर्षांपूर्वी आमदार आबीटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय लोकांना रूचला नव्हता. पण विकासाचे व्हिजन घेऊन चाललेल्या आबीटकर यांनी वीज, रस्ते, आरोग्य यांच्या समस्या शीघ्र गतीने सोडवत बरेच प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेले गद्दारीचे आरोप निष्प्रभ ठरवत आबीटकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याचा जनतेने निर्णय घेतला. अन् त्यांनी निवडणुकीत यश मिळवत विजयाची हॅटट्रीक केली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article