For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेन ड्राईव्ह प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण

01:07 PM May 20, 2024 IST | VISHAL_G
पेन ड्राईव्ह प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण
Advertisement

देवराजेगौडा-शिवरामेगौडा यांच्यातील संभाषण व्हायरल

Advertisement

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisement

खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या पेन ड्राईव्ह प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण मिळत आहे. वकील देवराजेगौडा आणि शिवरामेगौडा यांच्यात झालेल्या चर्चेचा आणखी एक ऑडिओ व्हायरल करण्यात आला आहे. कुमारस्वामी यांचे नाव सांगण्याबाबत शिवरामेगौडा यांचा ऑडिओ व्हायरल झाला असून आता या ऑडिओने पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे. शिवरामेगौडा आणि देवराजेगौडा यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाला असून यामध्ये शिवरामेगौडा यांनी देवेगौडा यांच्याबद्दलही लघु टीका केली आहे.

देवराजेगौडा यांच्या आरोपांबाबत शिवरामेगौडा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर हा ऑडिओ व्हायरल झाला आहे. या ऑडिओमध्ये एल. आर. शिवरामेगौडा यांनीच अश्लील पेन ड्राईव्ह शेअर करण्यासाठी दबाव आणल्याचे उघड झाले आहे. याशिवाय ऑडिओमध्ये कुमारस्वामी, देवेगौडा आणि अमित शहा यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.