क्लायमेंट चेंजमुळे बदलतोय पॅटर्न
उत्तरेकडे शिफ्ट होतोय पाऊस
जगभरात कार्बन उत्सर्जन आणि हवामान बदलामुळे ट्रॉपिकल पाऊस शिफ्ट होत आहे. हा पाऊस उत्तरेच्या दिशेने जात आहे. पूर्ण जगात हे घडत असले तरीही याचा भारतावर थेट प्रभाव पडत आहे. मागील काही वर्षांमध्ये पाऊस अधिकाधिक उत्तरेकडे जात आहे, विशेषकरून हिमालयाच्या दिशेला, यामुळे मोठ्या आपत्ती घडत आहेत.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या क्लायमेट सायंटिस्ट्सनी अध्ययन करत हा खुलासा केला आहे. हवामान बदलामुळे भूमध्य रेषेच्या आसपास पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल होत आहे. याचा प्रभाव जगातील अनेक देशांच्या कृषीक्षेत्र आणि अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. वेगाने वाढणारे उत्सर्जन पावसाला उत्तरेच्या दिशेने ढकलत आहे. ही काही सोपी प्रक्रिया नाही. ही अत्यंत जटिल स्थिती आहे. जटिल परिस्थितींमुळे पाऊस दरवर्षी उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. भूमध्य रेषेजनीकचा भाग जगात होणाऱ्या सुमारे एक तृतीयांश पावसाचे कारण ठरतो.
वाऱ्यांचे क्रॉस कनेक्शन
आंतर-उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र (आयटीसीझेड), भूमध्य रेषेच्या आसपासचे क्षेत्र आहे, जेथे उत्तर आणि दक्षिण गोलार्धातून येणारे वारे परस्परांना कापतात. या भागाचे वैशिष्ट्या म्हणजे येथे वाऱ्यांचे क्रॉस कनेक्शन होते. यामुळे ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.
ट्रॉपिकल वर्षावनांमध्ये प्रचंड पाऊस
परस्परांना कापल्यावर वारे वरच्या दिशेने जातात, तेथे तापमान कमी असते, यात समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाफ येते, अधिक उंचीवर हे वारे थंड होतात आणि वाफेमुळे ढग होतात. मग याच ढगांमुळे पाऊस पडतो. अनेक ट्रॉपिकल वर्षावनांमध्ये एका वर्षात 14 फूटांपर्यंत पाऊस पडतो.
पुढील 20 वर्षे....
पावसाचे उत्तर दिशेने जाणे पुढील दोन दशकांपर्यंत घडत राहणार आहे. मग दक्षिण महासागर तप्त झाल्याने होणारा मजबूत प्रभाव अशाप्रकारच्या हवामानाला पुन्हा दक्षिणेच्या दिशेने खेचणार आहे. मग पुढील हजारो वर्षांपर्यंत हीच स्थिती राहणार असल्याचे अध्ययन करणारे प्रमुख संशोधक वेई लियू यांनी सांगितले आहे.
हवामान बदलाचा प्रभाव
भूमध्य रेषेनजीकची क्षेत्रं म्हणजेच मध्य आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि प्रशांत बेटसमूह यामुळे सर्वाधिक प्रभावित होईल. या भागांमध्ये अनेक प्रकारचे पीक घेण्यात येते, कॉफी, पाम ऑइल, केळी, ऊस, चहाचे मळे, आंबे आणि अननसाचे पीक घेतले जाते. या भागांमध्ये पावसाच्या स्थितीत झालेला किंचित बदल देखील अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान पोहोचवू शकतो. हे अध्ययन नेचर क्लायमेट चेंज जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या अध्ययनात हवामान मॉडेलमध्ये महामसागर, सागरी बर्फ, भूमी आणि वायुमंडळाशी निगडित अनेक घटकांना सामील करण्यात आले.मागील काही दशकांच्या तुलनेत पाऊस सध्या 0.2 अंश उत्तरेच्या दिशेने सरकला आहे.