निरवडे आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला रुग्णाचा जीव
न्हावेली / वार्ताहर
निरवडे येथे लग्नाच्या निमित्ताने इन्सुली येथील मूळ व सध्या मुंबई येथे राहत असलेले शिवा परब हे आले होते अचानक दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते आपल्या भावाला घेऊन जवळच असलेल्या आरोग्य केंद्रात गेले.तर त्याठिकाणी उपस्थित असलेले निरवडे आरोग्य केंद्राचे डॅा.विक्रम मस्के आणि डॅा.संजीवनी लंबे यांनी त्या रुग्णाची स्थिती पाहून लगेच ईसिजी काढण्यास घेतला त्यात त्यांना समजले की रुग्णाला गंभीर ह्रदयविकाराचा धक्का आला आहे ह्यामुळे परब नामक रुग्णाचे ह्रदय व नाडी बंद होत असल्याचे निदर्शनास आले असता डॅा.विक्रम मस्के आणि डॅा. संजीवनी लंबे यांनी रुग्णाला सी.पी.आर.सेवा देण्यास सुरुवात केली आणि डॅाक्टरांनी स्वत : सी.पी.आर देत रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करुन त्या रुग्णाला नजीकच्या उपचारासाठी अतिदक्षता विभाग असलेल्या रुग्णालयात दाखल केले.त्या ठिकाणी त्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. डॅा.विक्रम मस्के आणि डॅा.संजीवनी लंबे यांनी वेळीच केलेल्या उपचारामुळे त्या रुग्णाला जीव वाचला असून नातेवाईकांनी देखील त्या डॅाक्टरांचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार,शिवसेना उपतालुकाप्रमुख संदिप पांढरे,वाहन चालक चेतन गावडे,देवानंद गावडे यांनी मोलाचे योगदान दिले.