For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपा वाढविण्यासाठी मोठे काम केल्यामुळेच पक्ष नक्कीच संधी देईल.पृथ्वीराज बाबा देशमुख

03:25 PM Mar 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
भाजपा वाढविण्यासाठी मोठे काम केल्यामुळेच पक्ष नक्कीच संधी देईल पृथ्वीराज बाबा देशमुख
BJP Prithviraj Baba Deshmukh
Advertisement

कडेगांव नगरपंचायतीच्या कामाचे ५ कोटीच्या विवीध विकास कामांचे भूमिपूजन काम संपन्न

कडेगांव प्रतिनिधी.

जिल्ह्यातील भाजपा सह मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी, नेतेमंडळी यांचे नेहमीच चांगले सहकार्य असल्याने जिल्हाध्यक्ष कारकिर्दीतीत पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक संघपणा ठेवण्यात यशस्वी झाल्याने जिल्हयातील सर्व नेतेमंडळी, कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या प्रामाणिक कामामुळे जिल्ह्यात भाजपाला मोठे यश मिळाले. २५ ते ३० वर्षे सत्ता नसताना संघर्षातून काम केलेंला मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे भारतीय जनता पार्टी माझा विचार नक्की करणार असून पक्षाने लोकसभेवर संधी दिल्यास सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केले

Advertisement

कडेगाव नगरपंचायतीच्या ५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यावेळी बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल, सभापती विजय गायकवाड, नगरसेवक अमोल डांगे, विजय खाडे, आशपाक पठाण, सुनिल गाडवे, संतोष डांगे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले
पुढे बोलतांना पृथ्वीराज देशमुख म्हणाले की जिल्ह्यामध्ये ड्रायफ्रूट, विमानतळ, औद्योगिकरणासारखे ज्वलनशील प्रश्न प्रलंबित असून जिल्हयात दुष्काळी भागात मोठ मोठे उद्योग आणण्याची गरज आहे. शाळगांव, बोंबाळेवाडी एमआयडीसी मध्ये मोठमोठे उद्योग आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यानें प्रयत्न केले म्हणुन आज ३०० ते ४०० कोटीचे मोठमोठे उद्योग भागात आल्याने अनेकांना रोजगार मिळाला.

Advertisement

मिरज, आटपाडी, कवठेमंकाळ, सांगली, पलूस, कडेगाव, जत, एमआयडीसीना चालना देल्यास मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामूळे जिल्ह्यात औद्योगिकरण वाढीसाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्याचा चौफेर विकासाचे व्हिजन माझ्याकडे तयार आहे.
लोकसभेला तिकीट देण्याचा सर्वस्वी अधिकार पक्षाला असून पक्षांमध्ये प्रामाणिक काम केल्याची नोंद आहे. त्यामूळे पक्ष आपल्यालाच संधी देणारा असून सर्वांना सोबत घेउन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने जिल्ह्यामध्ये विकासाची घौडदोड चालू ठेवणार असल्याची ग्वाही पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.

यावेळी जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, राजेंद्र दीक्षित, गणिभाई तांबोळी, दिलावर इनामदार,प्रकाश शिदे, बाळासाहेब धमै, विलास धमै,संदीप शिंदे,संदीप गायकवाड, अभिजीत लोखंडे, युवराज राजपूत, सुधाकर चव्हाण, निलेश लंगडे,बबन रासक, श्रीमंत शिंदे, जगदीश लोखंडे, सुनील भस्मे, मकरंद रणभोर, जगदीश लोखंडे, आशरफ तांबोळी, नवाज तांबोळी, समीर इनामदार, नईम पटेल,रमीज आत्तार, राकेश जरग, दत्तात्रय शिंदे, अरुण हवलदार, किशोर मिसाळ, प्रकाश गायकवाड, दादा रासकर, सुभाष रासकर मारुती माळी सदाशिव माळी, गणेश भोसले, तानाजी रासकर, तेजस रासकर तानाजी डांगे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.यांच्यासह मोठ्या प्रमाणात कायकतै उपस्थित होते.

"विकास कामांना प्राधान्य देउन नगरपंचायतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री सुरेश खाडे, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त निधी खेचून कडेगाव शहरातील उर्वरित विकास कामे मार्गी लावणार."
"नगराध्यक्ष धनंजय देशमुख."

Advertisement
Tags :

.