ऑनलाइन गेमिंग उद्योग 38 टक्क्यांने वाढ
अमेरिकेत टक्के 10, चीनमध्ये 8 टक्क्यांचा दराने वाढ, चीननंतर भारतामध्ये ऑनलाइन गेमर्सची सर्वाधिक संख्या
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अलीकडच्या वर्षांत देशांतर्गत ऑनलाइन गेमिंग उद्योगाची वाढ सर्वात वेगवान झाली आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि व्हेंचर कॅपिटल फर्म सिकोइयाच्या मते, भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योग सध्या वार्षिक 38 टक्क्यांच्या दराने वाढत आहे. 5जी दूरसंचार सेवा सुरू झाल्यानंतर ही वाढ आणखी नवी उंची गाठताना दिसेल. यामध्ये तुलानात्मक स्थिती पाहिल्यास हा उद्योग अमेरिकेत केवळ 10 टक्के आणि चीनमध्ये 8 टक्के दराने वाढत आहे.
केमीएमजी यांच्या माहितीनुसार, सध्या देशात 400 हून अधिक गेमिंग कंपन्या आहेत आणि सुमारे 42 कोटी ऑनलाइन गेमर्स आहेत. त्यांची संख्या केवळ चीनमध्ये यापेक्षा जास्त आहे. भारत जगातील टॉप पाच मोबाइल गेमिंग बाजारपेठांपैकी एक बनला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस भारतीय गेमिंग उद्योगाचे उत्पन्न 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल, असा अंदाज केमीएमजी यांने वर्तवला आहे, जे 2020-21 मध्ये 14,311 कोटी रुपये होते.
गुगल-मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या प्रकल्प चालवतात
गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या आधीच क्लाउड गेमिंग प्रकल्पांवर काम करत आहेत. उददुत ने 2020 मध्ये 4जी आणि 5जी नेटवर्कवर स्टॅडिया क्लाउड गेमिंगची चाचणी केली. मायक्रोसॉफ्ट कोरियन कंपनी एस के टेलिकॉम सोबतही हात मिळवला आहे.
एअरटेलच्या प्रमुख व्यवसाय धोरणाच्या केंद्रस्थानी असेल गेमिंग
भारती एअरटेल डिजिटलचे सीईओ आदर्श नायर म्हणाले की, गेमिंग हे आमच्या व्यवसाय धोरणाचे फोकस क्षेत्र असेल. 5जी तंत्रज्ञान कमी विलंबासह उच्च गती प्रदान करणार असल्याने, 5जी सर्वात जास्त क्लाउड गेमिंगसाठी वापरला जाणार असल्याचा अंदाज आहे.
देशात 5जी सह क्लाउड गेमिंग युग
या वर्षाच्या अखेरीस देशात 5जी सेवा सुरू होणार आहेत. यापूर्वी, प्रेंच क्लाउड गेमिंग फर्म ब्लॅकनट भारतात 5जी नेटवर्कसह क्लाउड गेमिंग सेवा सुरू करण्यासाठी रिलायन्स जिओ आणि एअरटेलशी चर्चा करत आहे.