For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात जुने रस्ते

06:22 AM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात जुने रस्ते
Advertisement

रस्त्यांद्वारे प्रवास करण्याचा प्रकार हजारो वर्षांपासून सुरू आहे. प्रारंभी रस्त्यांची निर्मिती प्रवास, व्यापार आणि सैन्याच्या परिवहनाला सोपे करण्यासाठी करण्यात आली होती. तसेच हे संस्कृतीच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक देखील होते. अशाच काही प्राचीन रस्त्यांवरून लोक आजही प्रवास कर आहेत.

Advertisement

गीझाचा रस्ता, इजिप्त

कैरोला इजिप्तमध्ये मोएरिस सरोवराशी जोडणाऱ्या सर्वात जुन्या पक्क्या रस्त्यांपैकी एक हा रस्ता सुमारे 4 हजार वर्षे जुना आहे. 12 किलोमीटर लांब हा रस्ता गीझाच्या पिरॅमिड्सच्या निर्मितीत वापरण्यात आलेल्या मोठ्या चुनादगडाच्या ब्लॉक्सच्या परिवहनासाठी अत्यंत आवश्यक होता. परंतु आता या रस्त्याचे केवळ काही हिस्सेच शिल्लक आहेत, पण हा रस्ता प्राचीन इजिप्तच्या प्रगत इंजिनियरिंगला दर्शवतो.

Advertisement

रेशीममार्ग

हा रस्ता पश्चिमेत रोमपासून चीनमध्ये चांगआनपर्यंत फैलावलेला आहे. याची निर्मिती सुमारे ख्रिस्तपूर्व 200 साली करण्यात आली होती. या रस्त्याने शतकांपर्यंत खंडांदरम्यान रेशीम, मसाले, किमती धातूंच्या व्यापाराला सुलभ केले. परंतु आता आधुनिक सीमांमुळे हा मार्ग खूप बदलला आहे, परंतु याचे अवशेष भारत, पाकिस्तान आणि तिबेटच्या काही हिस्स्यांमध्ये आजही दिसून येतात.

द रिज वे, ब्रिटन

ब्रिटनचा हा रस्ता देशातील सर्वात जुन्या रस्त्यांपैकी एक मानला जातो. हा इकनील्ड वेचा हिस्सा आहे. याचा काही हिस्सा 5 हजारपेक्षा अधिक वर्षांपासून वापरात आहे. याचा वापर मूळ स्वरुपात व्यापारी आणि प्रवासी करतात आणि हा रस्ता दक्षिण आणि पूर्व इंग्लंडच्या हायलँड्समधून जातो.

फारसचा शाही मार्ग

या रस्त्याची निर्मिती पाचव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात सम्राट डेरियस प्रथमच्या शासनकाळात झाली होती. तुर्कियेच्या सर्विसला इराणच्या सुखशी हा रस्ता जोडतो. याचा वापर शाही दूतांकडून केला जात होता आणि याने विशाल फारसी साम्राज्यात सुलभ संचाराची सुविधा प्रदान केली.

जीटी रोड, भारत

भारताच्या ऐतिहासिक रस्त्यांपैकी एक जीडी रोड चंद्रगुप्त मौर्यच्या शासनकाळात यूनानी राजदूत मेगास्थनीजकडून वर्णित बंगालच्या सोनार गावाला सिंधशी जोडत होता. नंतर शेरशाह सूरीने या रस्त्याची पुन्हा निर्मिती करविली आणि 18 व्या शतकात इंग्रजांनी याचा आणखी विस्तार केला. अधिकृत स्वरुपात याचे नाव जीटी रोड ठेवले. सद्यकाळात हा दक्षिण आशियातील सर्वात लांब आणि आवश्यक महामार्गांपैकी एक आहे.

Advertisement
Tags :

.