जगातील सर्वात जुनी ममी
इजिप्तपूर्वी चीनमध्ये तयार केली जायची ममी
इजिप्तच्या ममीपेक्षाही 5 हजार वर्षे जुनी जगातील सर्वात जुनी ममी आता एका देशात मिळाली आहे. चीन आणि दक्षिणपूर्व आशियात (फिलिपाईन्स, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया) 4000 ते 12000 वर्षे जुन्या थडग्यांमध्sय मिळालेले सांगाडे धूराने सुकवून ममी करण्यात आले होते असे नव्या अध्ययनातून कळले आहे. हे अध्ययन पीएनएएस नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
संशोधकांनी चीन, फिलिपाईन्स, लाओस, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियाच्या 69 थडग्यांमधील 54 सांगाड्यांचे अध्ययन पेले, यातील अनेक सांगाडे हायपरफ्लेक्स्ड (टाइट फीटल पोझिशनमध्ये वळलेले) होते, जे नैसर्गिक वाटत नव्हते. बहुधा मृतदेहांना बांधून ठेवण्यात आले असावे असे प्रथम वैज्ञानिकांना वाटले, परंतु एक्स-रे डिफ्रॅक्शन आणि इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीतून सांगाड्यांवर धुराच्या खुणा आहेत, परंतु थडग्यांवर नाही असे कळले.
यातून मृतदेहांना दफन करण्यापूर्वी आगीवर धुराने सुकविण्यात आले होते असे दर्शविते. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या हसाओ-चुन हंग यांनी धूर सुकविणे केवळ सडण्यापासून रोखण्यासाठी नव्हे तर अध्यात्मिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्त्वाचे होते असे सांगितले. ही प्रथा हंटर-गेदरर समुदायांमध्ये 12000 वर्षांपासून प्रचलित होती. सर्वात जुनी ममी 12000 वर्षे जुनी असून ती दक्षिण अमेरिकेच्या चिंचोर्रो संस्कृती (7000 वर्षे जुनी) आणि इजिप्तच्या जुन्या ममी (4500 वर्षे जुनी)पेक्षाही जुनी आहे.
मृतदेहांना कुरसी पोझिशनमध्ये बांधले जात होते. मग कमी तापमानयुक्त आगीवर अनेक महिन्यांपर्यंत धूराने सुकविले जायचे. यामुळे मृतदेह सडण्यापासून वाचत होता. सांगाड्यांवर सोट (काजळसारखा)च्या खुणा आणि रंगबदल होता, परंतु जळण्याच्या खुणा नव्हत्या. हा धूराने सुकविण्याचा पुरावा आहे. गरम अणि आर्द्रतायुक्त हवामानात धूर सर्वात प्रभावी होता. शरीराला समोरच्या बाजूने वर ठेवत धूराने सुकविण्यात येत होते. यामुळे बॅक्टेरिया मरण्यासह सडण्याची प्रक्रिया रोखली जात होती. संशोधकांनी इंडोनेशियाच्या पापुआ येथे जात दानी आणि पुमा समुदाय आजही मृतदेहांना बांधून धूराने सुकवित असल्याचे पाहिले. या ममी काळ्या पडतात आणि दशकांपर्यंत टिकून राहतात. या ममी त्वचा किंवा केसांसोबत मिळालेल्या नाहीत, परंतु जाणूनबुजून सुकविण्यात आल्याने त्यांना ममी मानले गेल्याचे हंग यांनी सांगितले.
कशी सुरू झाली प्रथा
ही प्रथा आफ्रिकेतून 65 हजार वर्षापूर्वी दक्षिणपूर्व आशियात पोहोचलेलया हंटर-गेदररांमुळे सुरू झाल्याचे संशोधकांचे मानणे आहे. बहुधा प्राण्यांच्या मांसाला धुराने सुकविण्याच्या प्रकारातून ते शिकले असावेत. हे एक आकर्षक रहस्य आहे की त्यांनी याचा कसा शोध लावला? परंतु हे मृतांना लोकांदरम्यान ठेवण्याची पद्धत होती, जी प्रेम, स्मृती आणि समर्पण दर्शवित असल्याचे हंग यांनी सांगितले.