For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात जुना ध्वज

06:01 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात जुना ध्वज
Advertisement

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव सामील

Advertisement

कुठल्याही देशाचा ध्वज हा केवळ कपड्याचा तुकडा नसतो. तर त्या राष्ट्राची ओळख, इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असतो. जगातील सर्व ध्वजांपैकी एक ध्वज स्वत:च्या ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखला जातो. हा ध्वज जगातील सर्वात जुना ध्वज म्हणून ओळखला जातो. डेन्मार्कच्या डॅनब्रोगला जगातील सर्वात जुना ध्वज म्हणून ओळखले जाते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून याला अधिकृत स्वरुपात मान्यताप्राप्त आहे. हा ध्वज 13 व्या शतकाच्या प्रारंभापासून सातत्याने वापरला जात आहे आणि याला 800 पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत.

डॅनब्रोगची कहाणी 15 जून 1219 रोजी एस्टोनियाच्या लिंडनिसच्या युद्धापासून सुरू झाली होती. युद्धादरम्यान हा ध्वज चमत्कारिक स्वरुपात आकाशातून कोसळला होता, असे बोलले जाते. या घटनेने डॅनिश सैनिकांना प्रेरित केले आणि त्यांनी विजय मिळविला होता. परंतु ऐतिहासिक अभिलेख या ध्वजाच्या 13 व्या शतकातील अस्तित्वाची पुष्टी करतात.

Advertisement

डॅनब्रोगच्या ध्वजात पांढरा क्रॉस ख्रिश्चन धर्म आणि शांततेचे प्रतीक आहे. याचबरोबर लाल पार्श्वभूमी साहस, शौर्य अणि शक्तिला दर्शविते. डॅनब्रोगच्या ध्वजाला गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. डॅनब्रोगच्या सरल आणि सुंदर डिझाइनने उर्वरित स्कँडिनेवियनकडून वापरण्यात येणाऱ्या नॉर्डिक क्रॉस शैलीला बऱ्याच अंशी प्रभावित केले. स्वीडन, नॉर्वे, फिनलंड आणि आइसलँडचा ध्वज डेन्मार्कच्या ऐतिहासिक प्रतीकाने प्रेरित आहे.

Advertisement
Tags :

.