सर्वात वृद्ध मगरीचा 124 वा वाढदिवस
आतापर्यंत 10 हजार पिल्लांना दिलाय जन्म
दक्षिण आफ्रिकेतील हेन्री नावाची मगर आता 124 वर्षांची झाली आहे. ही जगातील सर्वात वृद्ध जिवंत प्राण्यांपैकी एक आहे. हेन्रीची 10 हजारांहून अधिक पिल्लं आहेत. हेन्री अजून तंदुरुस्त असून अजून काही पिल्लांना ती जन्म देऊ शकते. जगातील सर्वात वृद्ध मगर हेन्री दक्षिण आफ्रिकेतील एका वन्यजीव संरक्षण केंद्रात राहेत. तिचा जन्म 1900 साली झाला होता. अशा स्थितीचा तिचा 124 जन्मदिन साजरा करण्यात आला आहे. हेन्रीवर वाढत्या वयाचा फारसा प्रभाव झालेला नाही.
हेन्रीची मंद मेटाबॉलिज्म, थंड रक्त असणे तिला ऊर्जा वाचविणे आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. मगरीसारखे काही सरीसृप वय वाढण्यासोबत आकाराने वाढत राहतात. हेन्रीचे वजन जवळपास 700 किलोग्रॅम तर लांबी सुमारे 5 मीटर असून अद्याप तिचा आकार वाढत आहे. हेन्री 6 मगरींसोबत राहते.
वैज्ञानिकांनी अलिकडेच आणखी काही प्राण्यांच्या दीर्घायुष्याविषयी शोध लावला आहे. राइट व्हेल 150 वर्षांपर्यंत जगू शकते. यूटामध्ये एक 47 दशलक्ष वर्षे जुन्या रोपाचे जीवाश्म मिळाले असून ते आजच्या कुठल्याही रोपापेक्षा वेगळे आहेत. एका नव्या अध्ययनात व्हेल पूर्वीच्या विचारापेक्षा अधिक आयुष्य जगू शकते असे समोर आले. साउथ राइट व्हेल दातरहित व्हेलचा एक प्रकार असून 100 वर्षांपेक्षा अधिक जगू शकते. साउथ राइट व्हेल काहीवेळा 130 ते 150 वर्षांपर्यंत देखील जगू शकतात. उत्तर अटलांटिक महासागरातील व्हेलपेक्षा हे वेगळे आहेत. तर उत्तर अटलांटिक महासागरातील व्हेलचे सरासरी आर्युमान केवळ 22 वर्षे आहे.
पूर्वीच्या अध्ययनात बोहेड व्हेलदेखील 100 वर्षांपेक्षा अधिक जगू शकते असे दिसून आले आहे. हा शोध मोठ्या प्राण्यांच्या दीर्घायुष्याविषयी अलिकडेच झालेल्या संशोधनांमध्ये सामील झाला आहे. त्यांचे दीर्घायुष्य समजून घेणे या लुप्तप्राय प्रजातींच्या रक्षणासाठी आवश्यक आहे.
यूटामध्ये 47 दशलक्ष वर्षे जुन्या एका रहस्यमय रोपाचा जीवाश्म वेगळा आहे. हे रोप जिनसेंगशी संबंधित असल्याचे वैज्ञानिकांना वाटले होते. परंतु संशोधनात हे पूर्णपणे वेगळे आणि आता विलुप्त झालेल्या परिवाराशी संबंधित असल्याचे कळले आहे.